ब्रेकिंग न्यूज

नराधम प्रा.विजय पवार,खाटोकर पोलिसांच्या ताब्यात.

गुरु शिष्याच्या नात्याला काळिंबा फासणाऱ्याना फाशीच द्या.

बीड शहरातील उमाकिरण हॉल येथील कोचिंग क्लासेस मध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीची प्रा.विजय पवार व खाटोकर याने वर्षभरापासून शारीरिक व मानसिक छळ केल्याने पीडित मुलींनी घडलेला प्रकार पालकांना सांगितल्यावर दोन्ही प्राध्यापकावर शिवाजी नगर पोलिस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यापासून पवार व खाटोकर हे फरार झाले होते परंतु आज पहाटे त्या दोघांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने बीड नजीक रात्री उशिरा अटक केली.

अल्पवीन मुलीला वर्षभरापासून हे दोघे जाणीवपूर्वक त्रास देत होते तिच्या शरीराला हात लावत तिला कपडे काढून फोटो काढले गेले असे देखील तिने तक्रार दिली होती.हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर या दोघांविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी स्थानिक गुन्हे शाखेसह इतर पोलीस ठाण्याचे पाच पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना केली होती.

बीड शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी व संघटनानि उमाकिरण शैक्षणिक संकुल समोर आंदोलन करत आरोपींच्या अटकेची मागणी केली होती तसेच आरोपी अटक न झाल्यास सोमवारी बीड बंदचे आवाहन करण्यात आले होते. यामुळे पोलिसावर वाढता दबाव लक्षात घेता पोलिस अधीक्षक यांनी तपासाची गती अधिक वाढवून पहाटे दोन्ही प्राध्यापकांना ताब्यात घेतले.

बीड स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली की विजय पवार हा नगरहून लिंबागणेश मार्गे त्याच्या चारचाकी सफारी गाडीतून मांजरसुंबा येथे येणार शनिवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास विजय पवारला लिंबागणेश येथे ताब्यात घेतले.तर प्रशांत खाटोकर हा धाराशिव येथून पुण्याकडे मांजरसुंबा मार्गे पवारच्या सोबत जाणार असल्याने त्याला ताब्यात घेतले.पोलिसांनीं सापळा रचून या दोघांना पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक खटावकर, महेश विघ्ने, श्रेणी पोउपनि सुर्यकांत गुळभिले, पोलीस अंमलदार महेशर जोगदंड, अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, सुनिल अलगट व सिद्धार्थ मांजरे यांनी केली.

 

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button