ब्रेकिंग न्यूज

महादेव मुंडेच्या पत्नीचा पोलीस अधीक्षक कार्यालयातच आत्मदहनाचा प्रयत्न.

माझ्या पतीच्या मारेकऱ्यांचा शोध लावा...ज्ञानेश्वरी मुंडे.

परळी येथील महादेव मुंडे हत्या प्रकरणी आज महादेव मुंडे कुटुंबाने पोलीस अधीक्षक कार्यालयातच आत्मदहनाचा प्रयत्न केला.

 महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास लावून आरोपीला अटक केली नाहीत तर आत्मदहनाचा इशारा देण्यात आला होता.त्या अनुषंगाने मुंडे कुटुंबीय बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात आज दाखल झाले होते. परंतु पोलिसांचा बंदोबस्त असल्याने पोलिसांनी हातातील पेट्रोलची बाटली हिसकावून घेतली यामुळे हा प्रयत्न फसला तसेच कुटुंबाशी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी चर्चा केली.

महादेव मुंडे कुटुंबीय व पोलीस अधीक्षक यांच्या चर्चा होऊन पोलिसांना तपासासाठी एक महिन्याचा वेळ देण्यात आला. परंतु शेवटच्या क्षणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी काहीतरी विषारी द्रव्यप्राशन केले की,चक्कर आली हे समजले नसून त्यांना उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण यानंतर वातावरण तापले होते.

परळी येथील महादेव मुंडे यांचा जवळपास १८ महिन्यापूर्वी खून झाला आहे. परंतु याचा अद्याप तपास पूर्ण नसून आरोपीही निष्पन्न नाहीत.

माझ्या पतीच्या माझ्या सिंदूरचे काय ?

माध्यमांशी संवाद साधताना ज्ञानेश्वरी मुंडे यांनी भारत पाकिस्तानात घुसून हल्ला करुन दहशतवाद्यांचा खात्मा करुन सिंदूर ऑपरेशन राबवून ज्यांच सिंदूर हिरावल त्यांना न्याय देतो मग माझ्या सिंदूरच काय? माझेही सिंदूर हिरावून घेतले असून ते हिरावून घेणारे परळीतच रहातात मग त्यांच्यावर कारवाई करुन मला न्याय कधी देणार? माझ्या सिंदूरचे काय ? असा प्रश्न ज्ञानेश्वरी मुंडे यांनी प्रशासन आणि शासनाला विचारला आहे.

मारेकऱ्यांना अटक करुन पतीला न्याय देण्यात यावा अशी मागणी करीत मयत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे या सतत आंदोलन करीत आहेत. पण प्रत्येकवेळी त्यांना फक्त आश्वासन देण्यात येत असून त्यानंतर काहीच हालचाल दिसत नाही. यामुळे त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर आज ज्ञानेश्वरी मुंडे या कुटुंबासह सकाळी ११:३० वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाल्या होत्या, यावेळी त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलीस कर्मचाऱ्यांनी हातातील पेट्रोलची बाटली हिसकावून घेतल्याने अनर्थ टळला. यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन चर्चा केली. चर्चा झाल्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी माध्यमाशी बोलताना पोलीस अधीक्षक यांनी योग्य दिशेने तपास सुरू असून, एलसीबीकडे तपास देऊन मी आहे तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळवून देणार असे आश्वासन दिले. तरीही आम्ही एक महिन्याचा वेळ तपासासाठी दिला असून, जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत माझा लढा सुरूच रहाणार असल्याचे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितले. पण यानंतर परत जाताना त्यांनी काहीतरी प्राशन केले की, चक्कर आली हे समजले नसून त्या जागेवरच कोसळल्या यामुळे त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या आत्मदहन इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक कार्यालयात सकाळपासून तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच येथे अग्निशमन दलाचे जवान, रुग्णवाहिका ही सर्व तैनात होते. यामुळे सकाळ पासूनच पोलीस अधीक्षक कार्यालयाचे वातावरण तापले होते.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button