अवैध मुरूम वाहतूक करणारा हायवा(टिप्पर)जप्त.
नायब तहसीलदार प्रशांत जाधवर याची बेधडक कारवाई.

बीड जिल्ह्यात वाळू,मुरूम,माती उत्खनन व वाहतुकीवर बंदी असताना देखील एक हायवा विनापरवाना मुरुम वाहतूक करत असल्याने महसूल विभागाने त्यावर कारवाई करण्यात आली.
अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाकडून एक पथक 18 जुलै ते 31 जुलै पर्यंत नेमण्यात आले होते.याची जबाबदारी,पथक प्रमुख म्हणून नायब तहसीलदार प्रशांत जाधवर नेमणूक करण्यात आली होती.
दिनांक 29 जुलै रोजी उपविभागीय अधिकारी नायब तहसीलदार बीड यांचे पथक गस्ती घालत असताना दुपारी अंदाजे 3.30 दरम्यान पालवन शिवारात रेल्वे पटरी नजीक एक हायवा ज्याचा क्रमांक MH 23 AU 6615 आहे, तो मुरमाची वाहतूक करताना पथकास आढळून आला. सदरचा हायवा थांबवून चालक नामे दिनकर माने राहणार बेलखंडे पाटोदा यास गौण खनिज वाहतूक परवाना बाबत विचारणा केली असता त्याने असा कोणताही वैध गौण खनिज वाहतूक परवाना नसल्याचे सांगितले .सदरच्या हायवाची पथकाने पाहणी केली असता त्यामध्ये अंदाजे तीन ब्रास मुरूम आढळून आला .सबब सदरचा हायवा विना परवाना मुरूम या गौण खनिजाची वाहतूक करताना आढळल्याने पुढील कारवाईकरता तहसील कार्यालयाच्या प्रांगणात लावण्यात आला आहे.
ही कारवाई उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या आदेशाने व तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख प्रशांत जाधवर,नायब तहसीलदार बीड यांचे समवेत महादेव जायभाये मंडळ अधिकारी चराटा,बंडू आगलावे ग्राम महसूल अधिकारी पालवन,महादेव चौरे सहायक महसूल अधिकारी बीड इत्यादींनी केली..
दगड ,माती, मुरूम इत्यादी गौण खनिजाची तहसील कार्यालयातून रीतसर परवानगी घेऊनच उत्खनन व वाहतूक करावी असे आव्हान तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केले आहे.
पथक प्रमुख प्रशांत जाधव यांची पथक प्रमुख म्हणून निवड झाल्यापासून 12 दिवसांमध्ये 2 माती,3 मुरुम वाहतूक करणारा हायवा,1 वाळू वाहतूक करणारा आयशर टेम्पो,1 जेसीबी व सेसेवाडी येथील खाडी क्रेशरवर कारवाई करण्यात आली आहे. नायब तहसीलदार प्रशांत जाधवर यांनच्या बेधडक कारवाईने अवैध वाळू,माती उत्खनन व वाहतूक बंद झाली असून वाळू माफी यांनी या पथकाचा धसका घेतल्याचे दिसत आहे.