ग्रामसभेतच सरपंचाला दिली जीवे मारण्याची धमकी,गुन्हा दाखल.
ग्रामपंचायत कार्यालयाच्या खिडक्याच्या काचा फोडल्या.

बीड(प्रतिनिधी)बीड तालुक्यातील शिवानी गावाचे सरपंच अजय सुपेकर यांना याच गावातील शिंदेंनी ग्रामसभे मध्येच गोंधळ घालत जीवे मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली.
दिनांक ९ ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वा. चे सुमारास गावात ग्रामपंचायत कार्यालय येथे मासिक सभा आयोजित केली होती.या सभे मध्ये ग्रामसेवक दशरथ गोविंदराव भोसले,ग्राम पंचायत सदस्य सुधाकर प्रल्हाद डोळस,निता गौतम सुर्यवंशी,राधाबाई आभिमान सानप असे उपस्थित होते.तसेच ग्रामपंचायत शिपाई परमेश्वर आबासाहेब थोरात, रमेश लक्ष्मण मोहिले हे तेथेच बाहेर थांबलेले होते. मासिक सभा चालु असतांना ग्रमपंचायत कार्यालयाचे आत मध्ये येऊन पंकज जनार्धन शिंदे हा दारु पिऊन आला व सदस्याना म्हणाला तुम्ही सभेला का आलात सभा घ्यायची नाही असे म्हणून आरेरावी बोलून सदस्यांना धमकावत गोंधळ घातला.ग्रामसेवक दशरथ गोविंदराव भोसले यांना म्हणाला मी सह्याचं रजिस्टर फाडुन टाकीण असे म्हणुन मोठ मोठ्याने शिविगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली,तुला मारून टाकतो असे म्हणाल्याने ग्रामसभेत एकच गोंधळ उडाला.त्यावेळी त्याला ग्रामसेवक दशरथ गोविंदराव भोसले यांनी शिंदेला समजावण्याचा प्रयत्न करत ग्रामपंचायत कार्यालया बाहेर आणले.
ग्रामसेवक व गावातील ग्रामपंचायत सदस्य समोरच हा प्रकार झाल्याने व सरपंचाला जीवे मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली यामुळे सर्वजन ग्रामपंचायत बंद करुन घरी गेले.त्यानंतर 11.00 वा. चे सुमारास ग्रामपंचायत कार्यालया बाहेर पुन्हा गर्दी झाल्याचे समजल्याने सरपंच सुपेकर हे ग्रामपंचायत कार्यालयाकडे गेले असता ग्रामपंचायत कार्यालयाच्या दोन खिडकीच्या काचा फुटलेल्या दिसल्या.त्यावर तेथे जमलेल्या लोकांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, पंकज जनार्धन शिंदे यांने काचा फोडुन ग्रामपंचायत बाहेर धिंगाणा घालत ग्रामपंचायत कार्यालयाच्या खिडक्याचे नुकसान केले आहे असे सांगितले. म्हणुन पंकज जनार्धन शिंदे रा. शिवणी याचे विरुध्द पिंपळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 352,351(2),324(4) कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पिंपळनेर पोलिस करत आहेत.