धक्कादायक ! गळफास घेतलेल्या अवस्थेत माय-लेकीचा मृतदेह आढळला.
हत्या की आत्महत्या घटनेबाबत संशय,तपास सुरु.

बीड दि. १८ (प्रतिनिधी):- दोन वर्षीय चिमुकलीसह आईचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आल्याची दुर्दैवी घटना मालेगाव (ता. गेवराई) येथे दिनांक१८ ऑगस्ट रोजी घडली.मायलेकी गळफास घेतलेल्या दिसल्याने मालेगावात एकच खळबळ उडाली.दोन वर्षाच्या चिमुकला पाहून ग्रामस्थानी हळहळ व्यक्त केली. सदरील घटनेबाबत संशय व्यक्त केला जात असून सदरील प्रकार हत्या की आत्महत्या ? या विषयी तर्क-वितर्क लावले जात आहेत.
गेवराई तालुक्यातील मालेगाव येथील अंकिता बळीराम घवाडे (वय २५) आणि शिवप्रीती घवाडे (वय २) या मायलेकीचा मृतदेह घरातील माळवदाच्या कडीला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. सोमवारी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. सदरील घटनेची माहिती कळताच स्थानिक पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी बीडच्या जिल्हा रुग्णालयात पाठवून दिले होत.
मायलेकीच्या मृत्यू विषयी संशय व्यक्त केला जात असून मुलीला फाशी देऊन स्वतः गळफास घेतला की आणखी काही प्रकार आहे असा प्रश्न उपस्थित होत असून पोलीस पुढील तपास गेवराई पोलिस करत आहेत.