ब्रेकिंग न्यूज
पुराच्या पाण्यातून वाचलेल्या तरुणांनी सांगितली”आप बीती”.
पोलिसांनी अंधारात जीव धोक्यात घालून वाचवले प्राण.

परळी दि १८ (प्रतिनिधी)- परळी तालुक्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी सदृश परिस्थिती असून परिणामी गावागावांतील नद्यांना पूर येवू लागले आहेत. याचा फटका कौडगाव हुडा येथील तरुणांना बसला. रविवारच्या मध्यरात्री र ११.३० ते १२ घ्या दरम्यान कौडगाव -कासारी रस्त्यावर हुडा येथील तरुणांची चार चाकी बलिनो कार गाव नदीच्या पुरात वाहून गेली. या गाडीतील चौघांपैकी तीन जणांना वाचवण्यात बचाव पथकांना यश आले तर केज तालुक्यातील मौजे बोरीसावरगाव येथील २४ वर्ष वयाचा विशाल बल्लाळ हा तरुण मयत झाल्याची माहिती “आप बीती”सांगितली.