
बीड(प्रतिनिधी) बीड जिल्ह्यात मारहाण,खुनाच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसत आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत हे गुन्हेगारी रोखण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत असून जिल्ह्यात रोज घटना घडत आहेत.आज सकाळीच सिरसाळा पोलीस ठाणे हद्दीत कौटुंबिक वादातून खुनाची घटना घडली.ही घटना ताजी असतानाच आज दुपारी शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत महिला होमगार्ड चा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली.
बीड बेपत्ता झालेल्या महिला होमगार्ड चा मृतदेह पांगरी च्या पुढे नाल्यात आढळून आल्याने खळबळ उडाली असून घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. अयोध्या राहुल व्हरकटे (वय २६) असं मयत महिलेचं नाव आहे.
बीड शहरा लगत असलेल्या पांगरीच्या पुढे असलेल्या एका नाल्यात अयोध्या यांचा मृतदेह आढळून आला आहे.घटनास्थळी शिवाजीनगर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे टीम पोहोचली आहे. दरम्यान अयोध्या यांच्या मृत्युमागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. शिवाजीनगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे. मयत महिलेचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्याला शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला.अयोध्या व्हरकटे बेपत्ता झाल्याबाबत शिवाजीनगर ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. दोन दिवसांपासून त्या बेपत्ता होत्या. वासनवाडीच्या पुढे पांगरी जवळील एका नाल्यात अयोध्या यांचा मृतदेह आढळून आल्यामुळे आता पोलिसांनी एका महिलेस ताब्यात घेतलं असून त्या महिलेची चौकशी देखील सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे . या घटनेमागे हत्येचा संशय व्यक्त करण्यात येतं असून पोलीस पुढील तपास करीत आहे