जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारातच पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न.
आरोपीला अटक करा,न्याय द्या म्हणत अंगावर पेट्रोल ओतून घेतले.

बीड प्रतिनिधी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या पंधरा दिवसापासून डॉक्टर वायबसे व त्याच्या गुंडाच्या टोळीवर कोणी दाखल करण्यात यावे यासाठी उपोषणास बसले होते. पंधरा दिवसापासून न्याय मिळत नसल्याने वायबसे कुटुंबीय यांनी २४ तासाच्या आत आत्मदहनाचा इशारा पोलीस प्रशासन व जिल्हाधिकारी यांना दिला होता.
केज तालुक्यातील कासारी येथील रामहरी महादेव वायबसे व त्यांचे कुटुंब गेल्या १४ ऑगस्ट पासून या दिवसापासून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात आमरण उपोषणाला बसलेल आहे. ऊन वारा पाऊस अंधार यांचा सामना करत अन्यायाविरुद्ध लढा संविधानिक पद्धतीने त्यांचा सुरू आहे. मात्र पोलीस प्रशासन कुठली भूमिका घेत नसल्याने. न्याय देत नसल्याने येणाऱ्या 24 तासात मला न्याय न दिल्यास मी आत्मदहन करणार असा इशारा कालच वाय बच्चे कुटुंबीयांनी पोलीस व जिल्हाधिकारी यांना दिला होता.
तरीही पोलीस प्रशासनाने व जिल्हाधिकारी कार्यालय यांनी दखलना घेतल्याने आज दिनांक २९ ऑगस्ट शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास उपोषणकर्ते रामहरी वायबसे यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, अंगावर पेट्रोल उठून घेत वायबसे कुटुंबीय न्याय मागत होते, आम्हाला गावाकडे गेले तरी डॉक्टर वायबसे हे मारून टाकणार त्यापेक्षा जिल्हाधिकारी यांच्या दारात मेलेले बरे असे सांगत होते.यावेळी पोलिसांची तारांबळ उडाली असं वेळीच पोलिसांनी वायबसे कुटुंबीयांना रोखल्याने पुढील अनर्थ टळला. उपोषणकर्त्याला आत्महत्याची वेळ आली आता तरी पोलीस व जिल्हाधिकारी कार्यालय आता तरी दखल घेणार का? डॉक्टर वायबसे व त्याच्या गुंडाच्या टोळीला आता तरी धारूर पोलीस ताब्यात घेणार का असा सवाल उपस्थित झाला आहे.