ब्रेकिंग न्यूज
मांजरसुंबा चौकात वाल्मीक कराडच्या समर्थनात घोषणाबाजी !
ओबीसी/मराठा कार्यकर्ते आमने सामने,शांतता भंग,समाजात फूट पाडणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.SP नवनीत कॉवत.

बीड (प्रतिनिधी) बीडच्या मांजरसुंबा परिसरात मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. याचवेळी काही ओबीसी कार्यकर्त्यांकडून वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत रस्त्यावरील वाहने अडवण्याचा प्रयत्न केला.
- ओबीसी नेते लक्ष्मण हाके आज बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. याचवेळी ते मांजरसुंबा परिसरात येण्यापूर्वी ओबीसी कार्यकर्त्यांनी आरोपी वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ ही घोषणाबाजी केली.”वाल्मीक अण्णा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है”,”वाल्मिक अण्णा अंगार हे बाकी सब भंगार है” या आशयाची घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. या घोषणामुळं परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
- सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मीक कराड हा जिल्हा कारागृहात असून त्याची जामीन अर्ज न्यायालयाकडून फेटाळण्यात आला आहे. पुढील सुनावणी 10 सप्टेंबर रोजी होणार आहे.
- अशातच मांजरसुंबा चौकात घोषणामुळे मराठा कार्यकर्ते देखील मांजर सोबत चौकात येऊन ओबीसी कार्यकर्त्यां समोर “एक मराठा लाख मराठा” अशा घोषणाबाजी दिल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.मात्र पोलिसांनी ही परिस्थिती वेळीच नियंत्रणात आणली. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर पाच दिवस आमरण उपोषण केले होते. यानंतर सरकारनं मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेट लागू करण्यचा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सहामागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. यानंतर ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
बीड पोलिसांचे सर्व नागरिकांना आवाहन आहे की शांतता राखावे. जिल्ह्यातील शांतता भंग करण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल.– पोलीस अधीक्षक, बीड