पुराच्या पाण्यात अडकलेल्या 11 जणांना हेलिकॉप्टरच्या मदतीने सुखरूप बाहेर कसे काढले पहा !
जिल्ह्यात ढगफुटी,अनेक गावांचा संपर्क तुटला,आमदार सुरेश अण्णा धस यांच्यामुळे वाचले 11 जणांचे प्राण.

बीड जिल्ह्यात पावसाने दमदार एंट्री केल्याने नागरिकांची तारांबळ उडाली असून नदी,तलाव ओव्हरफ्लो झाले असल्याने जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.
बीड जिल्ह्यातील कडा कडा ता.आष्टी परिसरात व धामणगाव परिसर तसेच पाथर्डी तालुक्यातील माणिक दवंडी परिसरातील आलंनवाडी, जेकेवाडी बोरसेवाडी लांडकवाडी, कोठेवाडी खरकटवाडी चितळवाडी आणि सावरगाव परिसरातील भागांमध्ये रात्री बाराच्या आसपास जो ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू झाला त्यामुळे सगळं पाणी व काही छोटे मोठे तलाव फुटल्याने कडा शहराला तसेच महेश मंदिर परिसर हे सगळे जलमय झाले आहे.जामखेड अहिल्यानगर वाहतूक कडा आणि धानोरा मुख्य महामार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक खोळंबले आहे. पुरामध्ये गाई वासरे म्हशी जनावराचा चारा भरलेले भोत, संसार उपयोगी साहित्य सर्वच्या सर्व अक्षरशा महापुराने गिळंकृत केले.
कडा शहरातील स्मशानभूमी मधील ग्रामपंचायत मालकीचे ट्रॅक्टर पाण्याचे टँकर कचरा गाड्या अक्षरशः खेळणी सारख्या वाहून गेल्या .
याप्रसंगी कडा विश्रामगृहासमोरील दूधसंघा लगत असलेल्या कोल्हापुरी बंधार्याजवळील साप्ते यांची वस्ती रात्री बारा ते दिवसा दोन वाजेपर्यंत पूर्णतः महापुरात होती या ठिकाणी असलेले सर्व गुरढोर जनावर अक्षरशा पाण्यामध्ये वाहून गेले तर या कुटुंबातील अकरा व्यक्ती स्लॅब बांधकाम असलेल्या घरावरती जाऊन बसल्याने मदतीची वाट पाहत होती. यावेळी आष्टीचे लोकप्रिय आमदार सुरेश आण्णा धस साहेब यांनी विशेष प्रयत्न करून अडकलेल्या अकरा जणांचा जीव हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सुखरूप केला. यावेळी नागरिकांना अश्रू अनवर झाले सुरेश आण्णा धस यांनी त्यांना धीर दिला.
* कडा येथील कोल्हापुरी बंधाऱ्याजवळ महापुरामध्ये अडकलेल्याची नावे :
गोविंद सापते,योगेश सापते,असराबाई सापते,मीनाबाई,सापते सुषमा, सापते आर्या सापते,काजल सापते,कृष्णा ससे,अमोल बेदरे,आकाश बेदरे,सुमन बेदरे आणि शेरी खुर्द येथील महेश पाटील विजय,प्रिती महेश,सुर्वणा विजय,राजदीप विजय,गायबाई रामदास पाटील यांनाही हेलिकॉप्टरच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले.या कामी आमदार सुरेश धस यांनी सर्वांना धीर देत मोठी मदत केली.
महसूल प्रशासनातील तहसीलदार आष्टी उपविभागीय अधिकारी पाटोदा जिल्हाधिकारी बीड विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर व अधिकारी कर्मचारी. तसेच पोलीस कर्मचारी हे सर्व बचाव आणि मदत कार्यासाठी प्रयत्न करत आहेत.