
बीड(प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात वाढत्या घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी – पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. त्याच – अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा बीडने – कारवाई करून दिवसा घरफोडी करणारा – आरोपी जेरबंद केला. या कारवाईत तब्बल – ९४ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. मिळालेल्या – माहितीनुसार, बर्दापुर पोलीस ठाण्यात – गु.र.नं. २०५/२०२५ कलम ३०५ (अ), ३३१(३) बी.एन.एस. अन्वये घरफोडीचा – गुन्हा दाखल होता. तपासादरम्यान गुप्त – बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून – आष्टी उपविभागातील वाकी शिवार येथे – संशयित आरोपी नोटया उर्फ गोठया उर्फ रामदास जपान काळे (रा. वाकी, ता. आष्टी, जि. बीड) यास १२ सप्टेंबर रोजी सापळा रचून अटक करण्यात आली.
चौकशीत त्याने बर्दापुर व अमळनेर हद्दीत दिवसा घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून दोन गुन्ह्यांचा तपास उघडकीस आला असून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने असा एकूण एकुण 94,000/-रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर आरोपीकडुन आणखी गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता आहे. इतर आरोपीतांचा शोधासाठी पथक रवाना करण्यात आले आहेत.पुढील तपास पोलीस स्टेशन बर्दापुर येथील अधीकारी व अमंलदार करीत आहेत.
सदरची कामगिरी बीड पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत,अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, बीड चे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, श्रीराम खटावकर पोलीस उप-निरीक्षक, पोलीस हवालदार अशोक दुबाले,सोमनाथ गायकवाड, बाळु सानप, राहुल शिंदे,आनंद मस्के, अर्जुन यादव, सय्यद अश्फाक, मनोज परजणे, सचिन आंधळे, अश्वीनकुमार सुरवसे यांनी केली आहे.