ब्रेकिंग न्यूज
सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम(IPS) यांनी स्वीकारला केज उपविभागाचा पदभार.
बीड जिल्ह्याला मिळाले आणखी एक IPS अधिकारी.

बीड : महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार त्रिपुरा संवर्गातून महाराष्ट्र संवर्गात बदली झालेल्या वेंकटराम (भा.पो.से.) यांनी आज दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक, केज या पदाचा पदभार स्वीकारला आहे.
दिनांक 7 ऑक्टोबर 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या आदेशानुसार वेंकटराम यांची नियुक्ती केज उपविभागासाठी करण्यात आली होती. याआधी सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांची 21 जुलै 2025 रोजी बदली झाल्यानंतर हे पद रिक्त होते. त्या कालावधीत केज उपविभागाचा अतिरिक्त पदभार सहाय्यक पोलीस अधीक्षक (अंबाजोगाई) श्री. हर्षिकेश शिंदे (भा.पो.से.) यांच्याकडे होता.
वेंकटराम यांनी आज केज येथे हजर होऊन अधिकृतपणे सहाय्यक पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्याने केज उपविभागास कायमस्वरूपी अधिकारी मिळाला आहे.