मंत्री छगन भुजबळ यांना बीड जिल्ह्यात पाय ठेवून देणार नाही : गंगाधर काळकुटे.
गनिमी कावा करणार.पत्रकार परिषदेत काळकुटे काय म्हणाले पहा.

बीड(प्रतिनिधी ) राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ हे मराठा आरक्षणाच्या जीआर ला विरोध करण्यासाठी बीडमध्ये येत आहेत. त्यामुळे त्यांना बीडमध्ये पाय देखील ठेवू न देण्याचा इशारा मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी दिलाय. छगन भुजबळ हे बंजारा, धनगर किंवा इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षण प्रश्नावर आले असते तर आम्ही विरोध केला नसता. परंतु ते मंत्री असताना मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी येत असून त्याला आमचा विरोध आहे. त्यांनी बीडमध्ये येण्यासाठी पोलीस बळाचा वापर केला तरी देखील आम्ही गनिमी काव्याने त्यांना विरोध करणारच असल्याची भूमिका मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी मांडली आहे.
मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये 17 ऑक्टोबर रोजी ओबीसी मेळावा होणार असून या पार्श्वभूमीवर आता बीडमध्ये वातावरण तापल्याचे दिसत आहे.
तर मंत्री छगन भुजबळ यांचे समता परिषदेचे सुभाष राऊत आणि गंगाधर काळकुटे यांच्यामध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळतंय. काल सुभाष राऊत यांनी बोलताना मराठा आरक्षणाच्या लावलेल्या बॅनर वरून व मराठा समन्वयक यांचे काळे धंदे बाहेर काढू असे आव्हान दिले होते आणि एकमेकांच्या व्यवसायावरून देखील ते आरोप-प्रत्यारोप करत आहेत. काल सुभाष राऊत यांनी गंगाधर काळकुटे यांना बॅनरवरून डिवचले होते. तर यावर आज गंगाधर काळकुटे यांनी पत्रकार परिषद घेऊन भोजन थाळी मध्ये गोरगरीब जनतेच्या अन्नात दलाली खाल्ली लाखो रुपये गोळा केले त्यांनी आम्हाला नैतिकतेच्या गप्पा शिकू नये असे उत्तर दिले आहे.