बांधकाम कामगार कार्यालय आहे की,लुटारुचा अड्डा?पाच पांडव करोडपती !
कामगार कल्याण अधिकारी,कर्मचारी व खाजगी एजंट मालामाल !

बोगस बांधकाम कामगार दाखवून शासनाची लाखोंची फसवणूक.
बीड(प्रतिनिधी) बीड जिल्ह्यात बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी राज्य सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत.परंतु या योजनेचा खरा लाभ मात्र बोगस कामगाराला होत असल्याचे चित्र सध्या बीड जिल्ह्यात दिसून येत आहे.
बीड मधील काही खाजगी एजंट व बांधकाम कामगार कार्यालयातील काही कर्मचारी कामगार कल्याण अधिकारी यांची मिलीभगत असून पैसा शासनाच्या निधीवर डल्ला मरत लुटण्याच काम करत आहे.
गोरगरिबांची तोंड मारताना कुठलाही अपराधीपणाचा लवलेश देखील चेहऱ्यावर दिसत नाही.या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोट्यावधीचं घबाड बुडाखाली दाबलं असल्याची माहिती मिळत आहे.
बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी अनेक योजना शासनामार्फत राबवल्या जात आहेत. पण याची फळ कामगारांना कमी आणि बोगस लाभार्थ्यांना जास्त मिळत आहे. कामगार कल्याण अधिकाऱ्यानी कॉन्ट्रॅक्ट बेस वर कर्मचार नेमणूक कोणत्या नियमाखाली केली आहे का फक्त वसुलीसाठी असा देखील प्रश्न पडत आहे.
कल्याणकारी योजनांचा फायदा बांधकाम मजुरांना होण्याऐवजी एजंटासह समन्वयकलाच जास्त होत असल्याचं दिसत आहे.त्या नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यास तुटपुंजी वेतन मिळत असताना कोट्यावधी रुपयांचे बंगले बांधकाम कामगारांचं शोषण करून उभा केल आहे.यांने जमवलेल्या मायेचा स्त्रोत हा गुढ आहे. ही माया गोळा करताना अनेक ग्रामपंचायतींचे बनावट सही शिक्के तयार करून घेतले गेले. या सही शिक्यांचा भरमसाठ वापर करत बनावट कागदपत्र तयार केली. यामध्ये शेकडो लोक बांधकाम मजुरांना मिळणाऱ्या योजनांचा बोगस लाभ घेत आहेत.धन दांडग्यांच्या घरात देखील कामगारांना वाटप केलेल्या भांड्याचे किट या माध्यमातून गेले. खरा गरजवंत बांधकाम कामगार मात्र यांच्या या काळ्या कारणाम्यामूळे योजना पासून कोसो दूर राहू लागला आहे. तीच स्थिती सध्या कामगारांच्या सुरू असलेल्या प्रशिक्षणाची आहे. फोटो काढायचं प्रशिक्षण दिले हे दाखवायचं. त्यातून मिळणारं 5 हजार रुपयाच अनुदान खिशात घालायचं. यामध्ये देखील सगळाच बोगस प्रकार सध्या तरी घडत आहे. याच कमाईचा काही भाग कामगार कल्याण अधिकारी यांच्यासह राजकीय व्यक्तींना देखील पोहोच होत असल्याने या विरोधात कोणी आवाज उठवायला किंवा जाब विचारला धजावत नाही. बांधकाम कामगारांशी निगडित हा विषय असल्याने माध्यमही याकडे फारसं लक्ष देत नाही. याच बोगसगिरीचा भांडाफोड गेवराई मध्ये झाला होता. याच्या चौकशीचा ससेमिरा काही जणांच्या पाठीशी लागला आहे. बीडचे हा महानग मात्र महागडा फ्लॅट, ग्रामीण भागात शेती, स्वतःच्या नावावर चार चाकी गाडी घेऊन मजा मारत असल्याचं पाहायला मिळत आहे.या विरोधात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन कारवाई करणार का?त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करणार का? बोगस बांधकाम कामगार शोधून त्यांच्यावर कारवाई करणार का? गोरगरीब बांधकाम कामगारांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तरी पदाच्या अधिकाराचा वापर जिल्हाधिकारी करणार का? असा सवाल सर्वसामान्य नागरिक करत आहेत. बांधकाम कामगार “उपाशी अन् बोगस कामगार असेच म्हणावे लागेल.
बीड जिल्ह्यात बांधकाम कामगार कर्मचारी अधिकारी व खाजगी एजंटाची चौकशी होणार का? गोरगरिबाच्या खाऱ्या लाभार्थ्यांच्या योजना लुटणाऱ्या बोगस कामगारावर देखील कारवाई होणार का?असा प्रश्न सध्या जनतेतून विचारले जात आहेत. बीड जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकाम कार्यालयातील सर्वच कर्मचारी अधिकाऱ्याची चौकशी करून जनतेसमोर पारदर्शकता आणावी व दोशी आढळल्यास त्यावर कारवाई करावी अशी देखील मागणी होत आहे.