ब्रेकिंग न्यूज

बीड शहरात जनावरे चोरी करताना चोरटे सीसीटीव्ही कैद.

पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा.

 

बीड शहरात जनावरे चोरणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातला असून, मागील काही महिन्यात बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत जाधव नामक व्यक्तीची गाय चोरून नेत असताना जाधव यांनी विरोध केल्याने त्यांच्यावर दगडफेक केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता,तसेच बीड शहरातील सहयोग नगर भागात देखील असाच प्रकार घडला होता तर त्याच दिवशी दुसरी घटना नगर रोडवरील बालेपिर भागात जनावरे चोरतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता पुन्हा आज पहाटे पेठ बीड भागात जनावरे चोरी करणारे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहे.

बीड शहरात या आधी देखील बरीच जनावरे चोरी गेल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाले असल्या तरी पोलिसांना ते चोरटे सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जनावरे चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याचे पुन्हा एकदा सीसीटीव्हीत कैद झाले आहे

आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पेठ बीड भागात जनावरे चोरी करताना तीन चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे.हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने जनावरे टोळी करणारी टोळी अद्यापही सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे.पेठ बीड पोलिसांनी त्या चोरट्यांना तत्काळ जेरबंद करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.तसेच याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची देखील गरज आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button