ब्रेकिंग न्यूज

बीडमध्ये महिलेला जबर मारहाण.मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद.

बीड शहरातील धानोरा रोड भागातील घटना.

बीड जिल्ह्यामध्ये रोजच कुठे ना कुठे मारहाण व खुनाच्या घटना घडत असल्याने यामुळे गुंडगिरी, दादागिरी करणाऱ्यावर पोलिसां वचक राहिला नसल्याचे देखील दिसत आहे.मागील महिन्यात अंबाजोगाई तालुक्यातील एका वकील महिलेस गावातीलच सरपंच व इतर लोकांनी अमानुष मारहाण केल्याने बीड जिल्हा हादरला होता. ही घटना ताजी असतानाच बीड शहरातील धानोरा रोड,महात्मा फुले नगर या भागात राहत असलेल्या दीक्षा कोरडे व दोन मुलांना शेजारी राहत असलेल्या दोघांनी जबर मारहाण केल्याची घटना घडली. 

कोरडे यांची मुले दारामध्ये खेळत असताना शेजारी राहणाऱ्या खेडकर यांनी शिवीगाळ केल्याने दीक्षा कोरडे या शिवीगाळ का केली असे विचारण्यासाठी गेले असता खेडकर व त्यांच्या पत्नीने दीक्षा कोरडे यांना जातीवाचक शिवीगाळ करत दोन मुलाना मारहाण केली ही घटना 30 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 8:15 वाजता महात्मा फुले नगर, धानोरा रोड, बीड येथे घडली. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

 शेजारी राहत असलेले वसंत खेडकर व त्याची पत्नी दोघांनी कोरडे यांना जातीवचक शिवीगाळ करत अमानुषपणे मारहाण केली. मुलाला लांब फेकून दिल्याने त्याला देखील मार लागला. या मारहाणी मध्ये दीक्षा कोरडे जखमी झाल्या असून मारहाणी मध्ये डोक्याला मार लागल्याने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button