ब्रेकिंग न्यूज

शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास गिराम यांनच्या रक्तदान शिबिरास उत्सुर्फ प्रतिसाद.

मुस्लिम तरुणांच देखील रक्तदान करून दिला एकतेचा संदेश.

 

बीड : (प्रतिनिधी ) पाकिस्तानी दहशतवाद्या विरोधात भारतीय सैन्यानी सुरु केलेल्या युद्धात शहीद भारतीय जावनाच्या शौर्याप्रति सदभावना व सध्या बीड शासकीय रुग्णालयामध्ये रक्ताचा तुटवडा भासत असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख उल्हास गिराम यांनी आज बीड शहरांत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरास देशाभीम असणाऱ्या तरुणांनी रक्तदान  शिबिरास उत्सर्फ प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे मुस्लिम बांधवानी ही रक्तदान करून देशाप्रति सदभावना दाखवत एकतेचा संदेश दिला.

बीड शासकीय रुग्णालयामध्ये सध्या रक्ताचा तुटवडा भासत असून अनेक गोरगरीब रुग्ण खाजगी रक्तपेढीतून रक्त विकत घ्यावे लागत असल्याने गोरगरिबांना याची झळ सोसावी लागत आहे. त्यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास भैय्या गिराम यांनी स्वतः रक्तदान करून युवकापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. यावेळी शिवसेना आयोजित शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

      याशिबिरास सह संपर्क प्रमुख बाळासाहेब अंबुरे, दैनिक झुंजार नेता चे संपादक अजित वरपे, दैनिक सामना चे जिल्हाप्रतिनिधी उदय जोशी सर, जिल्हा संघटक नितीन धांडे, उपजिल्हाप्रमुख हनुमंत जगताप, कर्मवीर परिवाराचे सोमनाथ धांडे, गणेश जाधव, राहुल जामकर, नंदकुमार येवले, सुरेश तात्या शेटे, माजी नगरसेवक सुधीर भांडवले, यांनी भेट दिली. या शिबिरास उपजिल्हाप्रमुख संजय महाद्वार, लक्ष्मण बहिरवळ सुशील पिंगळे, रतन तात्या गुजर, नवनाथ प्रभाळे, सरपंच प्रदीप कोटुळे, अतुल लोणकर, योगेश वादे, अझर सय्यद, ज्ञानेश्वर दाभाडे, सुजित गिराम, गिरीश गिराम, वैभव प्रभाळे, महेश भोसले, सौरभ इंगोले यासह अनेक तरुणांनी रक्तदान शिबिरास सहभाग नोंदवला.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button