घरफोडीचा गुन्हा २४ तासात उघड,दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
शिवाजीनगर पोलिसांची यशस्वी कामगिरी.

बीड(प्रतिनिधी)शिवाजीनगर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत दोन आरोपींना अटक केली असून, सुमारे ४ लाख १२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. १९ मे २०२५ रोजी विनोद रामनाथ बहिर (वय ४७, रा. श्रीरामनगर, बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८३/२०२५ भादंवि कलम ३३४(१), ३०५ बी.एन.एस. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोह/१६६४ आघाव, पोह/४५४ सोनवणे, पोशि/९८३ सारणीकर, पोशि/५११ सानप, पोशि/२०७७ रहाडे यांचे पथक तयार करण्यात आले.पथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाद्वारे गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेतला. तपासात आरोपी अभिषेक शेषेराव काशीद (वय २५, रा. चक्रधर नगर, बीड) आणि महेश अनिलराव साखरे (वय ३२, रा. जवाहर कॉलनी, बीड) यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली.
सदर आरोपींकडून तीन गॅस सिलेंडर (किंमत अंदाजे ९ हजार रुपये), एक पितळी पातेले (२ हजार रुपये), रोख रक्कम (१९०० रुपये) आणि गुन्ह्यात वापरलेला महिंद्रा सुप्रो मॅक्सी चारचाकी टेम्पो (किंमत ४ लाख रुपये) असा एकूण ४ लाख १२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपासादरम्यान शिवाजी नगर पोलिस ठाण्यात जुना गुन्हा क्रमांक.३०६/२०२४ अंतर्गत चोरी केलेल्या रेल मी ७ प्रो चोरी केल्याची कबुली दिली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत,अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाणे निरीक्षक मारुती खेडकर,पोह/१६६४ आर.जी. आघाव, पोह/454 सोनवणे, पोह/503 गायकवाड, मपोना/1838 चांदणे, पोशि/983 सारणीकर, पोशि/511 सानप, पोशि/2077 रहाडे, पोशि/487 येवले व पोशि/485 कांदे यांनी केली आहे.