सर्पदंशाने दोन सख्ख्या भावंडांचा मृत्यू.
धारूर तालुक्यातील कोयाळ गावावर दुःखाचा डोंगर.

बीड जिल्ह्यातील किल्लेधारुर तालुक्यातील कोयाळ येथे दोन सख्या भावंडांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे कालची रात्र मुंडे कुटुंबासाठी काळरात्र ठरली आहे. सर्पदंश झाल्याने दोन्ही भावंडांचा मृत्यू झाल्याने मुंडे कुटुंबासह गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रदीप मधुकर मुंडे रा. कोयाळ (ता. धारुर) हे शुक्रवारी (दि. २४) नेहमीप्रमाणे रात्रीचे जेवण करुन झोपले. दरम्यान मध्ये रात्री १२ ते १ च्या सुमारास मुलगी कोमल (वय ७ वर्ष), मुलगा शिवम (वय ५ वर्ष) यांच्या अंगावर साप आला आणि त्याने दोन्ही भावंडांना दंश केला. हा प्रकार प्रदीप मुंडे यांच्या लक्षात येताच त्यांनी दोन्ही लेकरांना घेऊन दवाखान्यात धाव घेतली, डॉक्टरांनी तपासणी करुन दोन्ही भांवडांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेने मुंडे कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले असून,एका लहानशा गावात एकाच वेळी दोन सख्या भावंडांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
साप दिसल्यास आमचे संपर्क करा.. सर्पमित्र दीपक वाघमारे.
बीड जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसापासून मान्सूनपूर्व पावसाने सुरुवात झाल्याने जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडत असून नदी,नाले,शेतात सापांच्या बिळामध्ये पाणी साचल्याने साप मानवी वस्तीकडे येत आहे.त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना सर्वाधिक साप दिसण्याचे प्रमाण वाढत आहे.सर्वच साप विषारी नसतात काही शेतकऱ्याचे मित्र देखील आहेत.त्यामुळे साप दिसल्यास आम्हाला संपर्क करा असे सर्पमित्र दीपक वाघमारे यांनी केले आहे.
संपर्क 9834142405.