टेम्पोने अँपे रिक्षाला उडवले चार ठार.
मयतात पती/पत्नीचा समावेश,रस्त्यावर रक्त मांसाचा सडा.

माजलगाव दिनांक १जून (तुकाराम येवले) माजलगाव तेलगाव रस्त्यावर भेगा पडल्या आहेत त्या भेगा वाचवण्यासाठी दुचाकस्वार समोरून येणाऱ्या ट्रकवर जावून धडकला त्यात दुचाकी दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला होता.ही घटना ताजी असतानाच रात्री पुन्हा मेहकर- पंढरपूर या पालखी महामार्गावरील तेलगाव-माजलगाव रस्त्यावर रविवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास अपघात होऊन त्यात चार जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. जखमींना माजलगाव येथील रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले. मयतात पती पत्नीच समावेश आहे. हा अपघात एवढा भिषण होता की, आयशरने टोल जवळपास ५० ते ६० फुट अंतरापर्यंत फरफटत नेले. घटनास्थळी दिंद्रुड पोलीस तात्काळ दाखल झाले.
या संदर्भात समजलेली माहिती अशी की, माजलगाव तालुक्यातील भाटवडगाव येथील कांही लोक टो क्र.एम एच.२३ एन ०२७३ ने रविवारी अकरा ते साडे अकरा वाजेदरम्यान तेलगावकडुन माजलगावकडे जात असताना सदरील टो नित्रुड जवळील एका पेट्रोल पंपा समोर आला असता समोरून येणाऱ्या आयशर क्र.एम.एच.२३ एम. ९२५५ ने टोला जबरदस्त धडक दिली. आयशरने धडक देताच टो जवळपास ५० ते ६० फुट दुर अंतरापर्यंत फरफटत नेले. या भिषण अपघातात टोमधील तीन जण जागीच ठार झाले असुन, मयतात एका महिलेचा समावेश आहे. तर दोन गंभीर जखमी झाले असुन, सर्व जखमी गंभीर आहेत तेलगाव येथील रूग्ण वाहिकेने माजलगाव येथील रूग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले. यात फारूक चांद सय्यद,त्यांच्या पत्नी सय्यद शवाना फारूक व शेख नोहिद एजाज क फैजान हे चार जण ठार झाल्याचे समजते. मयताच्या जवळ असलेल्या आधारकार्डवरून त्यांची ओळख झाली.अपघातातील इतर मयत जखमींचे नावे उपलब्ध होऊ शकले नाहीत. आयशर चालक घटनास्थळावरून पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच दिंद्रुड पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव ढाकणे यांच्यासह पोलीस कर्मचारी महेश साळुंखे, खलील मोमीन, सचिन गायकवाड, कानदास बनसोडे, चामनर आदि तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.