DYSP पूजा पवार यांचा बीड शहरातील जुगार अड्ड्यावर छापा.
शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदे बोकाळले.

बीड पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे नवनीत कॉवत यांनी घेतल्यापासून बीड जिल्ह्यातील अवैध धंदे करणाऱ्या विरोधात तसेच गुंडगिरी,दादागिरी करणाऱ्यावर कडक कारवाई करत हद्दपारीसह मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्या आहेत.
डी.वाय.एस.पी.पूजा पवार यांना मिळालेल्या गुप्त माहिती आधारे बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील धांडे नगर येथे जुगार अड्डा राजरोस सुरू असल्याची माहिती मिळाली असता त्या जुगार अड्ड्यावर डीवायएसपी पूजा पवार यांनी आपल्या पथकासह छापा मारला मारून त्या ठिकाणी 11 जुगारी तिरट नावाचा जुगार खेळताना मिळून आले, तसेच त्यांच्याकडे रोख रक्कम 45,000/रुपये, व मोटरसायकल, मोबाईल असे मिळून 9,79,000/ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत येऊन बाहेरील पोलिस अधिकारी कारवाई करत असतील तर स्थानिक पोलिस अधिकारी कारवाई का करत नाहीत यांची देखील चौकशी बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी केली पाहिजे.
शिवाजी नगर पोलिस ठाणे हद्दीत अवैधधंदे बोकाळले असून अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांच्या अर्थपूर्ण केल्यानेच जुगार अड्डा रोजरोज सुरू असल्याचे बोलले जात आहे.गेल्या महिन्यात शिवाजी नगर पोलिसांनी बार्शी रोडवरील सोमेश्वर मंदिराच्या पाठीमागील वीट भट्टी जवळ याच जुगार अड्ड्यावर कारवाई करत जुगार ठिकाणी लाखोची रोख रक्कम मिळाली असताना देखील फक्त 35,400/रुपये दाखण्यात आली होती.तसेच जुगार खेळणारे दहा ते पंधरा जण असताना फक्त पाच जणांवर कारवाई करूत मोबाईल हस्तगत करण्यात आले नव्हते व जुगार खेळणारा च्या दुचाकी सोडून देण्यात आल्या होत्या यामुळे त्या कारवाईकडे संशयाने पहिले जात होते.
DYSP पूजा पवार यांनी दोन दिवसापूर्वी बार्शी नाका भागात कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारे वाहन पाठलाग करून पकडण्यात आले होते.
ही कारवाई बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत,अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर,डी. वाय.एस.पी.पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.मुरली गंगावणे, पो.प्रदीप पिंपळे, पो.अनिल मदने, यांच्यासह दंगल नियंत्रण पथकातील जवान सहभागी होते.