महिलेच्या गळ्यातील सोने पळवणारे तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
बीड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

बीड जिल्ह्यात मागील काही महिन्यापासून महिलांच्या गळ्यातील चैन,सोने पळवणारी टोळी सक्रिय असल्याचे दिसत आहे.दिनांक 25/05/2025 रोजी फिर्यादी नामे सुमन सुरेश सारुक रा.नंदनवन कॉलनी नगर रोड बालेपीर बीड यांनी पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे फिर्याद दिली की, फिर्यादी हया त्यांच्या पती सोबत स्कुटी शिकण्यासाठी च-हाटा फाटा ग्राऊड येथे गेल्या होत्या परत घरी जातांना फिर्यादी स्कुटीवर एकटया जात असतांना फिर्यादी याचे पाठीमागुन अनोळखी तीन इसम हे विनानंबरच्या स्कुटीवर बसुन फिर्यादी यांचे जवळ आले व फिर्यादी यांचे गळयातील मिनी गंठन व सोन्याच्या मण्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसकाऊन च-हाटा फाटा बीड रोड कडे निघुन गेले. या मध्ये फिर्यादी यांचे सोन्याचे एकुण 22 ग्रॅम किंमती 88,000/- रुपयाचा मुद्वेमाल जबरी चोरी करुन घेवुन गेले होते. यावरुन पोलीस स्टेशन शिवाजीनगर गुरंन 294/2025 कलम 304,3(5) बी.एन.एस प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
पोलीस अधीक्षक बीड यांनी उघडकीस न आलेल्या गुन्हयाचा आढावा घेवुन उघडकीस न आलेले जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस निरीक्षक स्था.गु.शा.बीड यांना आदेशीत केले होते. त्यावरुन पोलीस उप-निरीक्षक श्रीराम खटावकर यांनी अभिलेखावरील उघडकीस न आलेल्या गुन्हयांचे विश्लेषण अभिलेखावरील गुन्हेगारांची माहिती काढत असतांना दिनांक 04/06/2025 रोजी गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हया हा 1) प्रकाश अशोक सानप वय 19 वर्षे 2) सिध्दांत अशोक जाधव वय 21 दोन्ही रा.रायमोह व एक (विधीसंघर्षग्रस्त बालक) रा.खरगवाडी यांनी मिळुन केला आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळाले वरुन आम्ही लागलीच टिम सह सदर आरोपीतांचे शोध कामी रायमोह येथे जावुन आरोपीतांचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेवुन गुन्हया बाबत विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली देवुन सदर चा उघडकिस आणला आहे.
सदर गुन्हयात एकुण तीन आरोपी आरोपी निष्पन्न झालेले असुन त्यापैकी एक (विधीसंघर्षग्रस्त बालक) आरोपींना स्था.गु.शा. पथकाने पुढील कार्यवाहीसाठी पो.स्टे.शिवाजीनगर यांचे ताब्यात दिलेले असुन गुन्हयातील गेलेमाल शोध पो.स्टे.शिवाजीनगर व स्थागुशा बीड करीत आहे.
सदरची कामगिरी ही नवनीत कॉवत पोलीस अधीक्षक बीड,अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोउपनि श्रीराम खटावकर, पोह/अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, पोना/ बाळु सानप, पोकॉ/अर्जुन यादव, अश्विनकुमार सुरवसे, चालक/सिध्देश्वर मांजरे, नेम. स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांनी केलेली आहे.