बीड शहरातून दिवसाढवळ्या डिग्गीतून एक लाख रुपये लंपास.चोरटे सीसीटीव्हीत कैद.
पाळत ठेवून पैसे लंपास करणारी टोळी सक्रिय.

बीड शहरातील मागील काही महिन्यामध्ये डिग्गीतून रक्कम लंपास होण्याच्या तसेच चेन गळ्यातील चैन स्नेचिंग च्या घटनेत वाढ झाली असल्याने नागरिकात भितीचे वातावरण पसरले आहे.
गेल्याच महिन्यात बार्शी नाका भागातील रहिवाशी अमोल मुसळे यांनी बार्शी रोडवरील एचडीएफसी बँकेतून रक्कम काढून स्कुटीच्या डिग्गी मध्ये ठेवून बार्शी नाका चौकापासून काही अंतरावर ज्यूस पिण्यासाठी थांबले असता,दहा मिनिटातच डिग्गीतून दोन लाख रुपये लंपस झाल्याची घटना घडली होती. सहा ते आठ चोरटे बार्शी नाका चौकातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असले तरी त्या चोरांचा तपास अद्यापही पेठ बीड पोलिसांना लागला नाही.
आज दिनांक २७ जून रोजी दुपारी बार्शी रोडवरील बँकेतून सूरज घुमरे यांनी एक लाख रुपये काढून स्कुटीच्या डिग्गी मध्ये ठेवून पोलीस अधीक्षक कार्यालया समोरील एका दवाखान्यात गेले. दवाखान्यातून बाहेर आले असता डिग्गी मधून एक लाख रुपये लंपास झाल्याचे लक्षात आले. दिवसा ढवळ्या एक लाख रुपये लंपास झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दुचाकी वर येऊन रक्कम लंपास करताना दोन चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती.दिवसाढवळ्या रक्कम लंपास करणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्तं केला जात आहे यामुळे नागरिकात भितीचे वातावरण पसरले आहे.