बॅनर काढण्यास गेलेल्या कर्मचाऱ्यांवर तरुणाने पिस्तुल रोखले.
माजी नगर सेवकाच्या मुलाचा प्रताप.शहरातील अवैध होल्डिंगवर कारवाई कधी?

बीड(प्रतिनिधी)बीड शहरात विविध ठिकाणी चौकात तसेच मुख्य रस्त्यावर विनापरवाना बॅनर लावले जात असून याकडे बीड मुख्यधिकारी यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे.
बीड शहरातील शिवाजीनगर भागात विनापरवानगी वाढदिवसाचे बॅनर लावल्याने ते काढण्यासाठी गेलेल्या नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर एका माजी नगर सेवकाच्या मुलाने पिस्तुल रोखल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला. बीड शहरातील बार्शी रोडवरील शिवराज पान सेंटरच्या परिसरात एका माजी नगर सेवकाच्या वाढदिवसाचे बॅनर विनापरवानगी लावण्यात आले होते. त्यामुळे नगर पालिकेचे काही कर्मचारी ते बॅनर काढण्यासाठी गेले असता त्या कर्मचाऱ्यास माजी नगरसेवकाच्या मुलाने रिवाल्वर रोखली त्यामुळे कर्मचारी भीतीने वातावरण पसरले आहे. परंतु या घटनेची चर्चा मात्र बीड शहरात रंगली होती.बीड नगरपालिका मुख्यधिकार्यांनी बीड शहरातील अनधिकृत बॅनरवर आता तरी कारवाई करणार का?आपल्या कर्मचाऱ्यावर दबाव टाकणाऱ्या त्या माजी नगरसेवकाच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा रहाणार का? हे पाहावे लागेल. नगरपालिका कर्मचाऱ्यांना रिवाल्वर दाखवून धाक दाखवण्यावर पोलिस तपास करून कारवाई करावी अशी मागणी नगरपालिका कर्मचाऱ्यातून होत आहे.