ब्रेकिंग न्यूज

पिस्टल बाळगणारासह तडीपार आरोपी जेरबंद.

शिवाजी नगर पोलिसांची कारवाई.

बीड जिल्ह्यामध्ये मागील काही महिन्यात अवैध शस्त्र पिस्टल बाळगणाऱ्यावर तसेच अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या सूचना बीड पोलिसांना बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिल्या आहेत. त्या अनुषंगाने विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्यावर कारवाई केली जात आहे.

 दिनांक 01/07/2025 रोजी शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील धानोरा रोड,बीड या ठिकाणी पांढ-या रंगाची ह्युडांई XCENT गाडी क्र. MH 05 BJ 1988 मध्ये दोन इसम अग्निशस्त्र ताब्यात बाळगुन घेवुन जात आहेत अशी गोपनीय माहिती शिवाजीनगर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांना मिळालेने सदर बातमीचे अनुषंगाने खात्री करुन कारवाई करण्याच्या सूचना तात्काळ पोलीस ठाणे पथक तयार करुन रवाना केले होते.

 पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या बातमीप्रमाणे धानोरा रोडवरील पंढरी कॉलनी समोर सापळा रचुन थांबलेले असतांना पांढ-या रंगाची ह्युडांई XCENT गाडी क्र. MH 05 BJ 1988 आल्याने सदर गाडी अडवुन त्यामध्ये दोन इसम 1) आमोल कल्याण पवार वय 29 वर्षे रा. घोडका राजुरी ता.जि. बीड ह.मु. बार्शी नाका, (2) बाबुराव मन्मथ वैराळे वय 33 वर्षे रा. कदमवाडी ता.जि. बीड मिळुन आले. त्यावेळी दोन्ही इसमांची अंगझडती घेतली असता अंगझडतीत बाबुराव मन्मथ वैराळे याच्या कमरेला एक गावठी बनावट लोखंडी पिस्टल ज्यास मॅग्जीन असलेला जु.वा. किं.50,000/- रु. असा मिळुन आल्याने सदरचा गावठी पिस्टल व गुन्ह्यात वापरलेली पांढ-या रंगाची ह्युडांई XCENT गाडी क्र. MH 05 BJ 1988 जप्त करण्यात आली. आरोपीनां पिस्टल विक्री करनारा इसम 3) राहुल प्रकाश तुपे रा. आशा टॉकीज धानोरा रोड बीड यास त्याच्या राहते घरुन ताब्यात घेण्यात आले. नमुद आरोपी राहुल प्रकाश तुपे हा बीड जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने बीड जिल्हातुन तडीपार असुन त्यावर तो तडीपारीच्या काळात बीड जिल्हात मिळुन आल्याने त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील आरोपी क्र.1) आमोल कल्याण पवार यांचे विरुध्द बीड जिल्ह्यातील वेगवेगळया पोलीस ठाणे येथे एकुण 08 गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी क्र. (2) बाबुराव मन्मथ वैराळे याचे विरुध्द जिल्ह्यातील वेगवेगळया पोलीस ठाणे येथे एकुण 02 गुन्हे दाखल असुन आरोपी क्र.3) राहुल प्रकाश तुपे याच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात एकुण 07 गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपींवर दाखल असलेले गुन्हे हे गंभीर स्वरुपाचे शरीराविरुध्द चे गुन्हे तसेच अवैध शस्त्र बाळगने अशा प्रकारचे आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नवनित काँवत अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग, बीड कमलेश मिना यांनच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक किशोर पवार,सपोनि / संदिप दुनगहु, सपोनि/गजानन क्षिरसागर, ग्रे.पो.उप.नि./ अब्दुलखय्युम कुरेशी, पोहवा/1664 रविद्र आघाव, पोना/470 ज्ञानेश्वर मराडे, पोशि/305 दिलीप राठोड, पोशि/617 अशोक राडकर, पोशि/2077 बाळु रहाडे, पोशि/904लिंबाजी महानोर, पोशि/511 अभिजीत सानप, पोशि/485 विलास कांदे यांनी केली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि/ज्ञानेश्वर धोत्रे हे करत आहेत.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button