घरकुल धारकांना तत्काळ धनादेश वाटप करा,अन्यथा बीड न.प.ला टाळे ठोकू :अशोक वीर
घरकुल लाभार्थ्यांना मुख्याधिकारी नीता अंधारेंनी जाणीवपूर्वक वेठीस धरले.

बीड(प्रतिनिधी) गोरगरिबांना हक्काचे घर असावे म्हणून राज्य सरकारने रमाई घरकुल योजना राबवण्यात आली आहे.बीड शहरात हजारो बेघर,गोरगरीब,कामगार नागरिक असून त्यांना हक्काचे घर नसल्याने रमाई घरकुल योजने अंतर्गत नगर पालिकेकडे केले होते त्यावर अंतिम यादी तयार होऊन तीन ते चार महिन्याचा कालावधी उलटून देखील पात्र लाभार्थ्यांना त्याचा धानदेश न मिळाल्याने लाभार्थी नगर पालिकेचे उंबरटे झिजवत आहेत.त्यामुळे गोरी गरीबाची फरपट कधी थांबणार असा प्रश्न सामान्य नागरिकाला पडला आहे. सामाजिक कार्यकर्ते अशोक वीर यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील धनादेश मिळत नसल्याने नगरपालिकेवर रोष व्यक्त करून नगरपालिकेला टाळे ठोकणार असे निवेदन दिले आहे.
बीड शहरातील घरकुल धारकांना दोन ते तीन दिवसात घरकुलाचे धनादेश न मिळाल्यास न.प.ला टाळे ठोकणार असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भावनाचे प्रणेते तथा बहिरवाडी चे माजी अशोक वीर यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात सांगितले आहे.
मार्च महिन्यात नवीन घरकुल साठी फंडा आला आहे. ३ ते ४ महिने झाले घरकुलाची यादी मंजुर व प्रसिध्द करुन, फलकावर लावण्यात आलेली आहे. बजेट पण आहे तरी पण ऐन पावसाळ्यात घरकुल धारकांनी घराचे बांधकामे सुरु केलेले आहेत.पात्र लाभार्थ्याच्या फाईलवर न.प. सिओ यांना सध्या सह्या करायला वेळ नाही म्हणुन बीड शहरातील घरकुल धारक न.प. मध्ये चकरा मारुन मारुन मेटाफुटीला आलेले आहेत. घरकुलचा धनादेश न मिळाल्याने घरकुलधारकांची बांधकाम बंद पडली असून सि.ओ. अंधारे मॅडम यांनी दोन ते तीन दिवसात सह्या करुन धनादेश घरकुल धारकांना वाटप नाही केल्यास सर्व घरकुल धारकांना सोबत घेवुन न.प. बीडला टाळे ठोकण्यात येईल. काही अनुचीत प्रकार घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी.अशा स्वरूपाचे लेखी निवेदन जिल्हाधिकारी यांना अशोक वीर यांनी दिले आहे.