वाल्मीक कराडला न्यायालयाचा दणका ! दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला.
कराडच्या प्रॉपर्टी जप्तीचा ४ ऑगस्ट रोजी फैसला.

मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांची दिवसा ढवळे अपहरण करून हत्या करण्यात आली होती.या प्रकरणी वाल्मीक कराड सह इतर आरोपीवर बीड न्यायालयात खटला सुरू होते.या आरोपीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.
वाल्मीक कराडने देशमुख हत्या प्रकरणातून दोषमुक्त करावे असा अर्ज न्यायालयात केला होता. या प्रकरणाच्या सुनावणी याआधी झाल्या होत्या, न्यायालयाने निकाल ठेवून आज दिनांक २२ ऑगस्ट मंगळवारी रोजी वाल्मिक कराडची दोषमुक्ती याचिका फेटाळली. विशेष मकोका न्यायाधिश व्ही. एच. पाटवदकर यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला. यावेळी या खटल्यातील विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची उपस्थिती होती.
संतोष देशमुख हत्या आणि इतर दोन प्रकरणातील एकत्रित दोषारोप बीडच्या विशेष मकोका न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष मकोका न्यायाधिश व्ही. एच. पाटवदकर यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. या खटल्यातील मकोका आणि हत्येच्या दोषारोपातून आपल्याला मुक्त करावे यासाठीची याचिका वाल्मिक कराडच्या वतीने दाखल करण्यात आली होती, तर सरकार पक्षाच्या वतीने वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. यावरील दोन्ही बाजूंचे युक्तीवाद पुर्वीच पुर्ण झाले होते आणि न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.मंगळवारी न्यायालयाने हा दोषमुक्ती अर्ज फेटाळला.
न्यायालयाने वाल्मीक कराडचा देशमुक्तीचा अर्ज फेटाळून दणका दिला आहे, तर सरकार पक्षाच्या वतीने वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. यावरील दोन्ही बाजूंचे युक्तीवाद पुर्वीच पुर्ण झाले होते आणि न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. मंगळवारी न्यायालयाने हा दोषमुक्ती अर्ज फेटाळला.
दोषमुक्ती अर्ज न्यायालयाने फेटाळल्याने वाल्मीक कराडला धक्का समजला जात आहे. वाल्मीक कराडच्या प्रॉपर्टी(संपत्ती)जप्ती बाबद ४ ऑगस्ट रोजी फैसला होणारा असून याकडे बीड जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.