वाल्मीक कराडच्या अडचणी वाढल्या,ॲड. उज्वल निकम काय म्हणाले पहा.
दोष मुक्त अर्ज न्यायालयाने फेटाळला,संपत्ती जप्ती बाबत 4 ऑगस्ट फैसला.

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मला निर्दोष मुक्त करण्यात यावे असा अर्ज जिल्हा न्यायालयासमोर वाल्मिक कराडने दाखल मागील दोन तारखेत झाले होते. आज जिल्हा न्यायालयाने यासंदर्भात निकाल राखून ठेवला होता. आज सकाळीच जिल्हा न्यायालयाने दोषमुक्ती अर्जावर निकाल देत वाल्मिक कराडचा अर्ज फेटाळून लावला. तसेच वाल्मिक कराडच्या प्रॉपर्टी जप्तीसंदर्भात व क्रमांक २,३ व ४ च्या आरोपींनी निर्दोष मुक्तीसंदर्भातच्या अर्जावर न्यायालयाने पुढील ४ तारखेला पुढील सुनावणी ठेवली आहे. खंडणीच्या जोरावर वाल्मिक कराडने जिल्हाभरामध्ये अनेक टोळ्या पोसल्या होत्या. याच टोळ्याच्या माध्यमातून ठिकठिकाणी वाल्मिकची दहशतत पहायला मिळत होती. अति तिथे मातीच असते या म्हणीप्रमाणे वाल्मिकच्या पापाचा घडा भरल्यानंतर वाल्मिक जेलमध्ये गेला. आजच्या निकालावरून वाल्मिक कराड या प्रकरणामध्ये दोषी असल्याचे निष्पन्न होवू लागले आहे. येणाऱ्या सुनावणीत काय काय होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
बीड कोर्टाच्या निर्णयावर समाधान: धनंजय देशमुख.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरुवातीपासून या प्रकरणात ज्यांनी स्वतः सह कुटुंबाला सावरत एक मोठा लढा न्यायासाठी उभा केला ते म्हणजे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज कोर्टाने दिलेल्या निर्णयावर समाधान व्यक्त केलं आहे. तसेच, एसआयटीने केलेल्या तपासामुळे हाच निर्णय अपेक्षित होता, असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना आपले मत व्यक्त केले.
ॲड.उज्वल निकमसह ॲड.कोल्हेंचेही कामकाज व कागदपत्र पाठपुरावा महत्त्वाचा.
संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंतच्या न्यायालयीन प्रक्रियेत अॅड. उज्वल निकम यांची जेवढी महत्त्वाची भूमिका आहे तेवढीच महत्त्वाची भूमिका ज्येष्ठ वकील बाळासाहेब कोल्हे व त्यांच्या टिमची आहे. यासंदर्भात सर्व कागदपत्रांची पूर्तता यासह इतर बारीक सारीक गोष्टींवर बाळासाहेब कोल्हे यांचे लक्ष असते. यामुळेच आतापर्यंत न्यायालयात संतोष देशमुख प्रकरणात यश मिळत आले आहे.