गोदापात्रात पोलिसांची धाड,२३ लाखाचा मुद्देमाल जप्त.
बीड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

बीड जिल्ह्यामध्ये वाळू उपसा व वाहतुकीवर बंदी असताना देखील जिल्ह्यात काही ठिकाणी चोरटी वाळू उपसा व वाहतूक केली जात आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याने ठिकठिकाणी वाळू वाहतूक अवैध धंदे करणाऱ्यावर तसेच गुंडावर कारवाया केल्या जात आहेत.
गेवराई तालुक्यातील खामगाव गोदापत्रात वाळू उपसा होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली असता आज दिनांक २३/७/२५ रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास गेवराई पोलीस स्टेशन हद्दीमध्ये खामगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रात स्थानिक गुन्हे शाखा पथकाने जाऊन रेड केली.
गोदापत्रात अंधाराचा फायदा घेऊन तेथील इसम,वाहन चालक पळून गेले त्यामध्ये एक जागीच पकडला.या छाप्यात एकूण चार ट्रॅक्टर व केन्या ताब्यातील आरोपीकडून जप्त केल्या. असा एकूण 23,00,000/-( तेवीस लाख रुपये )किमतीचा मुद्दाम तपासणी जप्त करून चार आरोपी विरुद्ध गेवराई पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे व एक आरोपी मुद्देमाल सह पोलीस स्टेशन येथे हजर केला आहे.
सदरची कार्यवाही बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत,अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि/सिध्देश्वर मुरकुटे, पो.राहुल शिंदे, पो. मनोज परजणे, अशपाक सय्यद व स्थानिक गुन्हे शाखेच्या टीम यांनी केलेली आहे.