टायगर ग्रुपच्या दणक्याने महिलेला मिळाला न्याय.
सुनीता गीते यांनी दिला होता आत्मदहनाचा इशारा.

बीड (प्रतिनिधी):- परळी येथील श्रीनाथ गोविंद गित्ते हे प्राथमिक आश्रमशाळा वसंतनगर, ता. परळी जि. बीड या शाळेत प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण (प्रादेशिक विभाग) छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश दि. ३ जुलै २०२५ नुसार शाळेवर रुजू होण्यासाठी वारंवार जाऊन देखी रुजू करून घेतले नसल्याने टायगर ग्रुप जिल्हाध्यक्ष राकेश जाधव यांनी पुढाकार घेऊन गोविंद गीते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिले होते.आश्रम शाळा व्यवस्थापन व समाज कल्याण बीड मधील अधिकाऱ्याला भ्रष्टाचारणे बरबटल्याने गोविंद गीते यास सेवेवर करून घेण्यास टाळाटाळ केली जात होती. पतीच्या निधनानंतर अनुकंपावर घरातील कुठलाही व्यक्तीस वारसदाराला सेवेत घेतले जाते. सुनीता गीते यांनी प्रचंड संघर्ष करुन स्वतः वरिष्ठ कार्यालयाच्या पायऱ्या झिजवल्या,वरिष्ठांनी रुजू करुन देण्याचे आदेशही दिले. मात्र बीड येथे भ्रष्टाचाराची कीड खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गोविंद गीते यांना अद्याप नोकरी वरती रुजू करून घेतला नाही. सुनीता गीते या स्वतः कर्करोगाने त्रस्त असुन उपचारासाठी आर्थिक अडचण आहे. मागील अनेक वर्षांपासुन पाठपुरावा करुन मुलाला अनुकंपावर नियुक्ती आदेश दिले असताना देखील संबंधीत शाळा रुजू करुन घेण्यास मनाई करत आहेत. संबंधीत शाळेवर अथवा बीड जिल्हयात कोणत्याही शाळेत अथवा कार्यालयात गोविंद गीते यांना दि. २१/०७/२०२५ पर्यंत रुजु करून न घेतल्यास कार्यालयासमोर दि. २३/०७/२०२५ रोजी आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला होता.परंतु टायगर ग्रुप जिल्हाध्यक्ष राकेश जाधव यांच्या पुढाकाराने समाज कल्याण आयुक्त यांनी लेखी स्वरूपात दिले. राकेश जाधव यांच्यामुळेच आज मला व कुटुंबाला न्याय मिळाल्याचे सुनिता गीते यांनी प्रसार माध्यमासमोर सांगितले.