होळी येथील विशेष पोलीस महानिरीक्षक यांचा सेवापूर्ती सोहळा
माजी मुख्य न्यायाधीश संभाजीराव शिंदे यांची विशेष उपस्थिती

अंबाजोगाई – अभय जोशी
दि १८ ऑगस्ट केज तालुक्यातील होळचे सुपूत्र राज्याच्या व्ही आय पी सुरक्षा विभागाचे माजी विशेष पोलीस महानीरक्षक अंकुशराव शिंदे हे नुकतेच सेवा निवृत्त झाले. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून सेवापूर सन्मान सोहळ्याचे आयोजन होळ येथे रविवार दि १७ ऑगस्ट रोजी हनुमान मंदीर येथे करण्यात आले. या वेळी त्यांची जंगी मिरवणूक हि काढण्यात आली. यासाठी राजस्थान माजी न्यायमूर्ती संभाजीराव शिंदे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी सरपंच अश्विनीताई शिंदे या होत्या . माजी सरकारी वकीक ऍड प्रकाश शिंदे,डॉ ज्ञानोबा सरवदे,बारामती ऍग्रो प्रबंदक अंकुश ढवारे, धर्मराज शिंदे,केंद्र प्रमुख रमेश कांबळे,डॉ गणेश ढवारे,,डॉ नवनाथ घुगे यांचाही समावेश होता. होळ ग्रामस्थासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याने ग्रामस्थांच्या सहकार्यानेआणि सहभागाने हा सोहळा पार पडला. परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ,आणि मोठया प्रमाणात उपस्थिती या मुळे हा विशेष सोहळा अविस्मरणीय झाला .
