
- अंबाजोगाई – प्रतिनिधी :—–
बीड जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर ६१ जागांपैकी ३० महिला राखीव
बीड/प्रतिनिधी
बीड जिल्हा परिषद निवडणुकांसाठी अखेर आरक्षणाचा तक्ता जाहीर करण्यात आला आहे. एकूण ६१ जागांसाठी विविध प्रवर्गानुसार आरक्षण निश्चित करण्यात आले असून त्यामध्ये महिलांसाठी तब्बल ३० जागा राखीव आहेत. यामध्ये सर्वसाधारण महिला,ओबीसी महिला तसेच अनुसूचित जाती- जमाती महिला या प्रवर्गांचा समावेश आहे.
ही आरक्षण यादी जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या गोटात चढाओढ सुरू झाली आहे आगामी निवडणुकीसाठी ही आरक्षणाची रचना महत्त्वाची ठरणार असून अनेक तालुक्यांत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तालुकानुसार आरक्षणाचे तपशील
गेवराई (९ जागा)
रेवकी — सर्वसाधारण महिला
तलवाडा — सर्वसाधारण
जातेगाव — सर्वसाधारण
गढी — सर्वसाधारण
धोंडराई — सर्वसाधारण महिला
उमापूर — ओबीसी (महिला)
चकलांबा — ओबीसी
मादळमोही — सर्वसाधारण महिला
पाडळसिंगी — सर्वसाधारण
माजलगाव (६ जागा)
केसापुरी — अनुसूचित जाती
गंगामसला — ओबीसी
टाकरवण — सर्वसाधारण महिला
तालखेड — अनुसूचित जाती
पात्रुड — सर्वसाधारण महिला
दिंद्रुड — सर्वसाधारण महिला
वडवणी (२ जागा)
उपळी — ओबीसी (महिला)
चिखलबीड — सर्वसाधारण
बीड (८ जागा)
राजुरी — सर्वसाधारण महिला
बहिरवाडी — सर्वसाधारण महिला
पिंपळनेर — सर्वसाधारण
नाळवंडी — सर्वसाधारण महिला
पाली — सर्वसाधारण महिला
नेकनूर — ओबीसी
लिंबागणेश — सर्वसाधारण
चौसाळा — सर्वसाधारण
शिरूर-पाटोदा (७ जागा)
घाटशिळ पारगाव — सर्वसाधारण महिला
रायमोहा — सर्वसाधारण
पाडळी — ओबीसी (महिला)
पिंपळनेर — सर्वसाधारण
डोंगरकिन्ही — ओबीसी
अंमळनेर — ओबीसी
पारगाव घुमरा — सर्वसाधारण
आष्टी (७ जागा)
दौलावडगाव — सर्वसाधारण महिला
धामणगाव — सर्वसाधारण
धानोरा — सर्वसाधारण महिला
लोणी (स) — सर्वसाधारण महिला
कडा — सर्वसाधारण महिला
मुर्शदपूर — सर्वसाधारण
आष्टा — सर्वसाधारण महिला
केज (७ जागा)
विडा — सर्वसाधारण महिला
येवता — ओबीसी (महिला)
आडस — ओबीसी
होळ — अनुसूचित जाती (महिला)
चिंचोलीमाळी — ओबीसी (महिला)
नांदुरघाट — ओबीसी (महिला)
युसूफवडगाव — सर्वसाधारण
धारूर (३ जागा)
तेलगाव — अनुसूचित जाती (महिला)
भोगलवाडी — अनुसूचित जमाती
आसरडोह — ओबीसी
परळी (६ जागा)
सिरसाळा — सर्वसाधारण
पिंप्री — अनुसूचित जाती
माडवा — सर्वसाधारण महिला
मोहा — अनुसूचित जाती
जिरेवाडी — अनुसूचित जाती (महिला)
धर्मापुरी — ओबीसी
अंबाजोगाई (६ जागा)
जोगाईवाडी — सर्वसाधारण
घाटनांदूर — सर्वसाधारण महिला
पट्टीवडगाव — सर्वसाधारण
बर्दापूर — ओबीसी (महिला)
चनई — ओबीसी (महिला)
पाटोदा म. — अनुसूचित जाती (महिला)
आरक्षणाचे एकूण स्वरूप
एकूण जागा — ६१
महिला राखीव जागा — ३०
अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग — १०
ओबीसी प्रवर्ग — १८
सर्वसाधारण प्रवर्ग — ३३
या आरक्षणानुसार आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी साठी उमेदवार ठरविण्याच्या हालचालींना वेग आला आहे.अनेक तालुक्यांमध्ये महिला नेतृत्वाला मोठी संधी मिळाल्याने महिला उमेदवारांचा सहभाग यंदा लक्षणीय वाढण्याची शक्यता आहे.राजकीय पक्षांकडून संभाव्य उमेदवारांची नावे ठरविण्याची चढाओढ लवकरच सुरू होणार असल्याचे वृत्त आहे.