ब्रेकिंग न्यूज

दिवसाढवळ्या स्कुटीच्या डिग्गीतून चोरट्याने केले दोन लाख रुपये लंपास.

आठ ते दहा चोरट्यानी पाठलाग करत रक्कम लांबवली.

बीड शहरातील बार्शी नाका, इमामपूर रोड येथील रहिवासी अमोल श्रीमंत मुसळे चरा 40 वर्ष व्यवसाय खाजगी चालक हे बार्शी रोडवरील HDFC बँकेतून 4,90,000/ हजार रुपये डिग्गीतून चोरले. दिवसा ढवळ्या डिग्गीतून पैसे चोरल्याने एकच खळबळ उडाली .

अमोल मुसळे यांना चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी बँकेतून रक्कम काढून घराकडे  TVS जुपिटर क्र MH-23-BG-1501 या स्कुटी वरून जात असताना अज्ञात चोरट्याने पाठलाग करत बार्शी नाक्या जवळ थांबले असता डिग्गीतून दोन लाख रुपये लांबवले.

दि 20/05/2025 रोजी दुपारी 12.20 वाजनेच्या सुमारास अमोल मुसळे व मेव्हने महेश आसाराम गलधर रा. बार्शीनाका शिवनेरी नगर पेठ बीड असे स्वराज्य नगर बाजिराव काँप्लेक्स बीड येथीलHDFC बैंक येथे जाउन महेश गलघर यांनी बँकेतुन पैसे 4,90,000/-(चार लाख नव्वद हजार) मला काढुन दिले सदर पैशामधील 2,90,000 /-(दोन लाख नव्वद हजार रुपये) मी माझ्या खिशात ठेवले व उर्वरीत दोन लाख रुपये (2,00,000/-) माझी TVS जुपीटर जिचा पासिंग क्र MH-23-BG-1501 हिच्या डिक्कीमध्ये ठेउन आम्ही दोघे HDFC बँक येथुन बार्शी नाक्यावर मयुर ज्युस सेंटर पेथे आंदाजे 12.30 वा सुमारास आलो म्युरज्युसच्या समोर माझी TVS जुपीटर क्र MH-23-BG-1501 लग्न आम्ही दोघे ज्युस पेन्यासाठी आतमध्ये जावुन ज्युस पिवुन बाहेर गाडी जवळ येवुन गाडीची डिक्की उघडुन पाहीले आसता, मी गाडीच्या डिक्कीत ठेललेले 2,00,000/- (दोन लाख रुपये) सर्व दोनशे रुपयाच्या नोटा मला दिसल्या नाहीत अज्ञात चोरट्याने जुपीटर गाडीची डिक्की उघडुन चोरून नेले. पेठ बीड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून आठ ते दहा चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. दिवसाढवळ्या रहदारीच्या ठिकाणाहून स्कुटीतून डिग्गीतून पैसे चोरल्याने एकच खळबळ उडाली पुढील तपास पेठ बीड पोलीस ठाण्याचे कर्मचारी शिंदे करत आहेत.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button