ब्रेकिंग न्यूज

टिप्परने दुचाकी स्वारास उडवले एक जागीच ठार.

पाली तलावाजवळील कोळवाडी गावातील घटना.

बीड जिल्ह्यामध्ये दिवसेंनदिवस अपघातात वाढ होत आहे.मागील आठवड्यात गेवराई जवळ टेम्पो ने सहा जण चिरडले होते तर दुसरी घटना तेलगाव मार्गाव रस्त्यावरील भेगामुळे दुचाकी ट्रकवर आदळून मृत्यू पावला होता.तर त्याच दिवशी पुन्हा माजलगाव तेलगाव रस्त्यावर टेम्पो ने ऍप रिक्षा उडवल्याने रिक्षातील चार जणांचा मृत्यू झाला होता.ही घटना ताजी असतानाच आज सायंकाळी 5:30 वाजता बीड मांजरसुंबा रस्त्यावरील कोळवाडी गावानजीक शेख अथर शेख दाऊद (वय 47, रा. ढेकनमोहा हल्ली मुक्काम मोहम्मदिया कॉलनी, बीड) हे मांजरसुंबा कडून बीडकडे मोटरसायकलने (क्रमांक MH23 AH 9986) येत असताना, कोळवाडी दुचाकी स्वरास टिप्परने मागून धडक दिली यात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला. यावेळी रस्त्यावर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.या अपघातात मृत्यू पावलेल्या शेख यांना रुग्णवाहिकेने बीड येथील शासकीय रुग्णालयामध्ये आणण्यात आले.

 त्या दुचाकीला बांगड्या अडकवल्या होत्या त्यावरून तो खेड्यावरून बाजारा मधून किंवा एखाद्या शुभकार्यामध्ये बांगड्या भरण्यासाठी गेला असल्याचा अंदाज आहे.शेख हे मुळगाव ढेकनमोहा येथील रहिवासी होते,होमगार्ड असल्याची देखील.माहिती मिळत असून जोडधंदा म्हणून बांगड्याचा व्यवसाय करत होते या अपघाताची माहिती मिळतात ढेकनमोहा गावावर शोककळा पसरली.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button