ब्रेकिंग न्यूज

उमाकिरण क्लास सील करण्याचे आदेश.

बीड मध्ये उद्या शैक्षणिक बंद,सर्वपक्षीय संघटनाचा बैठकीत निर्णय.

बीड शहरातल्या नावाजलेल्या उमाकिरण शैक्षणिक संकुलामध्ये सुरू असलेल्या कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थिचा विनयभंग केल्याप्रकरणी प्रा.संचालक विजय पवार, प्रशांत खाटोकर या दोघां विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने दोघेही फरार आहेत या प्रकरणाने बीड जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून पालकांमध्ये संतप्त भावना दिसून येत आहेत.

आज सकाळपासूनच पालकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी उमाकिरण गेट समोर ठिय्या आंदोलन केले होते. त्यामुळे या परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.या गंभीर प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेत बीड जिल्हा पोलीस अधीक्षक यांना लेखी पत्राद्वारे तात्काळ सूचना करून दोषी विरोधात कठोर कारवाई करण्या बाबतचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर तपासाचा अहवाल तात्काळ महिला आयोगाला सादर करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पत्रात बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांना दिल्या आहेत.

फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी चार तपास पथक तयार करण्यात आली आहेत. राज्य महिला आयोगाने उमा किरण क्लासचे सीसीटीव्ही फुटेज तातडीने ताब्यात घेऊन आरोपींना अटक होईपर्यंत क्लासची इमारत सील करण्याचे आदेश रुपारी चाकणकर यांनी दिले आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button