ब्रेकिंग न्यूज

गटविकास अधिकारी(बीडिओ)मुंडे लाच घेताना घेताना चतुर्भुज.

सेवानिवृत्त ग्रामसेवकाच्या बाजूने दोषारोपत्राचा अहवाल देण्यासाठी लाचेची मागणी

तक्रारदार (सेवानिवृत्त) ग्रामसेवकावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली होती. त्यावरील दोषारोपपत्राचा अहवाल तक्रादाराच्या बाजूने पाठविण्यासाठी दहा हजारांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून गट विकास अधिकाऱ्यांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधाकर श्रीरंग मुंडे (वय 57, रा. श्रीराम चौक ऐश्वर्या नगरी, अहिल्यानगर) असे त्याचे नाव आहे.

सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की तक्रारदार हे सेवानिवृत्त ग्रामसेवक असून त्यांच्यावर गटविकास अधिकारी राहुरी यांच्या अहवालावरून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर तक्रारदार हे सेवानिवृत्त झाले होते. त्यांचे वरील दोषारोप पत्राचा अहवाल गट विकास अधिकारी यांनी पाठवायचा होता तो अहवाल तक्रारदार यांच्या बाजूने पाठविण्याकरिता गट विकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी दहा हजारांची लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली त्यानंतर तत्काळ २० जून २०२५ रोजी पडताळणी सापळा लावला असता गटविकास अधिकारी मुंडे यांना दहा हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई पोलिस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक छाया देवरे यांच्या पथकातील पोलिस नाईक चंद्रकांत काळे, पोलिस कॉन्स्टेबल सचिन सुद्द्रुक, हरूण शेख यांच्या पथकाने केली.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button