आ.धनंजय मुंडेंना संपवून वाल्मीक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती:बाळा बांगर
आरोपींच्या अटकेसाठी पावसात चार तास रस्तारोको,बाळा बांगर यांनी केले धक्कादायक खुलासे.

परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांची १९ महिन्यापूर्वी हत्या झाली होती,त्या हत्येचा वैद्यकीय अहवाल चार दिवसापूर्वी आला असून मानेवर,तोंडावर,पाठीवर तीक्ष्ण हत्याराने वार झाल्याने अतिरक्तस्त्राव होऊन मुंडे यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
महादेव मुंडे यांच्या खूनाचा तपास सीआयडी व एसआयटी कडे देण्यात यावा व आरोपींना अटक करावी या मागणीसाठी कन्हेरवाडी व भोपला ग्रामस्थांनी कन्हेरवाडी येथे परळी-अंबाजोगाई महामार्गावर शुक्रवार भर पावसात चारतास रास्तारोको आंदोलन केले.
महादेव मुंडे हत्या घटनेला १९ महिने उलटले असताना आरोपींना अद्यापही अटक झाली नाही. यामुळे मागील काही दिवसांपासून मुंडे कुटुंबिय आक्रमक झालेले आहे. प्रशासन, पोलिस दरबारी अनेक खेटे मारुनही अद्याप न्याय मिळालेला नाही. १८ महिन्यांतमध्ये ८ तपास अधिकारी बदलले असून आतापर्यंत एकाही पोलीस अधिकाऱ्याला आरोपींचा शोध लावण्यात यश आलेले नाही. त्यामुळे आठवडाभरापूर्वी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्यांच्याकडील पेट्रोलच्या बाटल्या काढून घेतल्यानंतर त्यांनी विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.बीड पोलिस अधीक्षकानी मुंडे कुटुबीयांना या हत्येतील तपासासाठी आणखी वेळ मागितला असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असे आश्वासन दिले.
यानंतर आता मुंडे कुटुंबासह कन्हेरवाडी व भोपला या ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या सासर आणि माहेरच्या गावकऱ्यांनीही आक्रमक भूमीका घेतली आहे. महादेव मुंडेंची हत्या करणारे आरोपी निष्पन्न करुन त्यांना अटक करावी यासाठी सकाळी कन्हेरवाडी व भोपला ग्रामस्थांच्या वतीने परळी-अंबाजोगाई मार्गावर कन्हेरवाडी येथे रास्ता रोको करण्यात आला. दरम्यान, महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास सध्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड हे करत आहेत. या तपासासाठी १० जणांचे विशेष पथक पोलिसांनी तयार केले आहे. गुन्हे शाखेचे पथक सध्या गोट्या गितेचा शोध घेत आहे. या आंदोलनात मस्साजोग येथील दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख, पाटोदा येथील विजयसिंह उर्फ बाळा बांगर, शिवराज बांगर,परळी तालुक्यातील राजेभाऊ फड यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बाळा बांगर यांनी वाल्मीक कराड बद्दल धक्कादायक खुलासे करत वाल्मिक कराड हाच धनंजय मुंडेंना संपवून पोट निवडणूक घेणार होते असा आरोप करण्यात आला व त्याची कॉल रेकॉर्डिंग सुद्धा धनंजय मुंडे यांना देणार असल्याचे सांगितले आह एकच खळबळ उडाली.