बीड शहरातील दिप हॉस्पिटल मध्येच डॉक्टरची आत्महत्या !
डॉ.ढवळे यांनी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचा संशय.

बीड शहरातील नामांकित दीप हॉस्पिटल मध्ये डॉक्टरांनी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस आल्याने एकाच खळबळ उडाली.
डॉ.संजय सोनाजी ढवळे वय.30 वर्ष राहणार जूजगव्हाण ता.जि.बीड.ह.मु.बीड यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण घेऊन बीड शहरातील दीप हॉस्पिटल मध्ये Rmo म्हणून रुग्णांची सेवा करत होते.
डॉ.ढवळे यांना दवाखान्यातील इतर डॉक्टरांनी मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु, डॉ. ढवळे यांचा संपर्क होत नसल्याने सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनी नातेवाईकांना याची माहिती देऊन डॉ. ढवळेच्या केबिनचा दरवाजा वाजवला परंतु काही प्रतिसाद येत नसल्याने दरवाजा तोडण्यात आला तेव्हा डॉ.ढवळे यांना पाहून सर्वांना धक्का बसला त्यांच्या जवळ काही इंजेक्शन सापडले असून त्यांनी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचे प्रथम अंदाज लावण्यात आला.डॉ.ढवळे यांनी झोपेचे इंजेक्शन,भूल देण्याचे इंजेक्शन घेतले की आणखी काही घेऊन आत्महत्या केली हे शवविच्छेदन अहवालातच स्पष्ट होईल.
परंतु एका सामान्य कुटुंबातील मुलाने उच्चशिक्षन घेऊन डॉक्टरकीची पदवी मिळवली त्या तरुण डॉक्टरांने जीवन संपवल्याने कुटुंबाला धक्का बसला असून हळहळ व्यक्त होत आहे.डॉ.ढवळे यांचा मृतदेह शवविच्छेदानासाठी बीड शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.डॉ.ढवळे यांच्या आत्महत्याचे कारण स्पष्ट आहे.
या घटनेची माहिती ढवळे यांच्या नातेवाईकांना दिल्यावर शासकीय रुग्णालयात नातेवाईकानी आक्रोश केला.यावेळी मित्रपरिवार व नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. डॉ. ढवळे यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट असून बीड शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी दीप हॉस्पिटल येथे दाखल होऊन तपास करत आहेत.