
बीड(प्रतिनिधी)बीड पोलीस अधीक्षक यांनी बीड जिल्हयामध्ये होणाऱ्या घरफोडया उघड करण्याचे सुचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या त्या अनुषंगाने घरफोडी करणाऱ्या आरोपींचा शोध सुरु होता. जानेवारी महीण्यामध्ये पोलीस ठाणे बर्दापुर हद्यीत एकुण तीन ठिकाणी घरफोडया झालेल्या होत्या. त्या घरफोडया करणाऱ्या आरेापींचे नांवे तांत्रिक बाबींचा आधारे उघड झालेली होती परंतु आरोपी मिळुन येत नव्हते, दिनांक 26.07.2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त् बातमीदारामार्फत् माहीती मिळाली की बर्दापुर येथे घरफोडी करणारे आरोपी हे माने कॉम्प्लेक्स बीड येथे थांबलेले आहेत. त्यावरुन पोनि/श्री बंटेवाड, स्थानिक गुन्हे शाखा,बीड यांनी सदरील आरोपी पकडण्यासाठी मार्गदर्शन करुन पथक रवाना केले व पथकाने झडप मारुन आरोपींना पकडले. त्यांची नांवे 1)शेख ईरफान मुनीर, वय 21 वर्ष, 2) मुस्तफा कासिम पठाण, वय 27 वर्ष, दोन्ही रा.अंबेकडकर चौक,पानगांव ता.रेणापुर जि.लातुर असे आहेत. त्याचे कडे गुन्हा संदर्भाने चौकशी केली असता त्यांनी बर्दापुर येथे जानेवारी महीण्यामध्ये मौजे गिरवरी, जवळगाव व बर्दापुर येथे बंद असलेल्या घरामध्ये चोरी करुन सोने व पैसे घेवुन गेल्याची व घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. त्याचे कडुन पोलीस ठाणे बर्दापुर येथील एकुण 03 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आनण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असुन आरोपीना पुढील तपासकामी पोलीस ठाणे बर्दापुर यांचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास सपोनि/ससाणे, प्रभारी अधिकारी पोलीस ठाणे बर्दापुर हे करीत आहेत.
सदरील आरोपी हे कुख्यात दरोडेखोर व चोऱ्या करणारे पोलीस अभिलेखावरील आरोपी असुन त्याचे वर यापुर्वी विमानतळ पोलीस ठाणे नांदेड येथे 03 गुन्हे, नांदेड ग्रामीण येथे 01 गुन्हा, रेणापुर येथे 01 गुन्हा, परळी ग्रा येथे 01 गुन्हा असे चोरी व दरोडया सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी नवनित काँवत, पोलीस अधीक्षक,बीड चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई शिवाजी बंटेवाड, पोलीस निरीक्षक स्था.गु.शा.बीड, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि सिध्देश्व्र मुरकुटे, पोलीस हवालदार, विकास राठोड, राहुल शिंदे, नितीन वडमारे, पोलीस अंमलदार आशपाक सय्य्द, मनोज परजणे, नारायण कोरडे, सर्व स्था.गु.शा.बीड यांनी मिळुन केलेली आहे.