स्वतःचा जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या तरुणाचे वाचवले प्राण !
DYSP शिंदे PSI दहिफळे यांनी पाण्यात वाहून जाणाऱ्या तरुणाला दिले जीवनदान.

बीड(प्रतिनिधी)बीड जिह्यात दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर मागील चार दिवसापासून पावसाचे दमदार हजारे लावली.
बीड जिल्ह्यात संततधार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील अनेक पूल पाण्याखाली गेले आहे.बीड परळी तालुक्यातील कडगाव हुडा शिवारातील तेलेसमुख रस्त्यावर असलेल्या लिंगी नदीवरील पुलावरुन मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी वाहत होते.या पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने चारचाकी गाडी सह गाडीतील चार युवक पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना रविवारी (ता.१७) मध्यरात्री ११ ते १२ च्या सुमारास घडली.
यासंदर्भात तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार कडगाव हुडा शिवारातील तेलेसमुख रस्त्यावर असलेल्या लिंगी नदीवरील पुलावर सलग तीन दिवस पडलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी वाहत होते. रविवारी रात्री साडे अकरा ते बाराच्या सुमारास दिग्रस (तालुका परळी) येथील अमर पौळ (वय २५), राहुल पौळ (वय ३०), पुणे येथील राहुल नवले (वय २३) व विशाल बल्लाळ (वय २३) हे परळी येथील लग्न समारंभातून कोडगाव हुडा मार्गे डिग्रस कडे बलेनो कार ने जात होते.
रात्री अंधारात पुलावरील पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने व अंधारामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने कारसह चारही व्यक्ती पाण्यात वाहून गेले, काही जण पुरात झाडात अडकले होते. या घटनेची माहिती कळताच महसूल व पोलीस प्रशासन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य राजाभाऊ पौळ तसेच दिग्रस व कोडगाव हुंडा , पिंपरी येथील ग्रामस्थ यांनी तात्काळ धाव घेत रात्री १ ते ४ वाजेपर्यंत तब्बल तीन तास अथक प्रयत्न करून नदीचे पुरातील पाण्यात अडकलेल्या अमर पौळ या युवकास DYSP शिंदे व PSI दहिफळे यांनी पाण्याचा बाहेर काढले..