ब्रेकिंग न्यूज

ज्ञानेश्वर सोनवणेचा यांची शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्याने मित्रानी,ग्रामस्थांनी केला सत्कार. 

आदर्श निर्माण करणारी एक प्रेरणादायी मैत्री.धनराज खटके 

प्रतिनिधी/पिंपळा आष्टी तालुक्यातील पिंपळा येथे रमेश सोनवणे यांचा मुलगा शासनाची पवित्र पोर्टल या परीक्षेतून उत्तीर्ण होऊन शिक्षक पदावर विराजमान झालेल्या वर ज्ञानेश्वर सोनवणे याचा मित्रांनी व ग्रामस्थांनी मोठ्या थाटामाटात सत्कार केला.त्याचे मित्र नेहमी त्याच्या सोबत असायचे.ज्ञानेश्वरला चांगली नोकरी मिळावी.यासाठी त्यांनी खूप मदत केली.ज्ञानेश्वरने खूप मेहनत घेतली आणि अखेर त्याला एका चांगल्या शासनाच्या नियमाने पवित्र पोर्टल ही परीक्षा उत्तीर्ण होऊन शाळेत नोकरी मिळाली.त्याच्या मित्रांना जेव्हा ही बातमी समजली,तेव्हा त्यांनी ज्ञानेश्वरचा आनंद द्विगुणित करण्यासाठी एक छोटासा सत्कार समारंभाचे आयोजन केले.त्यांनी ज्ञानेश्वरला शुभेच्छा दिल्या आणि त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

या घटनेतून, “गरिबी” कधीही “मैत्री” आणि “संबध” यांच्यामध्ये अडसर ठरत नाही,हे दिसून येते.मित्रांनी ज्ञानेश्वरला दिलेली साथ आणि त्याचा सत्कार,यामुळे ज्ञानेश्वरला खूप आनंद झाला.यावेळी उपस्थित.संजय कुलकर्णी साहेब.राजेंद्र लोखंडे साहेब.पत्रकार.युवराज खटके.माजी उपसरपंच.डि.के शिंदे.पोपट पवार.माजी.ग्रा.प.सदस्य.जयराम लोखंडे.सरपंच.राजेंद्र खुरांगे.माजी.ग्रा.पं.सदस्य सचिन सुंबे.आजिनाथ जगधने.माणिक भवर.धनराज खटके.सागर शिंदे.दिनेश वर्मा.अरुण सचिन.प्राणी मित्र.दादा विधाते.बाळासाहेब देवकाते.कावळे कल्याण.भवर दादा.भिटे आदी मित्र परिवारांनी पुष्पहार व फेटा बांधून सत्कार केला.यामुळे ज्ञानेश्वरला खूप आनंद झाला आणि त्याच्या पुढील वाटचालीस प्रेरणाही मिळेल असा आशीर्वाद.ह.भ.प.गुरुवर्य राऊत दादा यांनी दिला.यावेळी समस्त ग्रामस्थ पिंपळा धनगरवाडी सुंबेवाडी काकडेवाडी या सत्कार समारंभात मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button