ब्रेकिंग न्यूज

बेपत्ता होमगार्ड महिलेचा खूनच !

पोलिसांनी केला २४ तासाच्या आत खुनाचा उलगडा,मैत्रीण व तीच्या मुलानेच केला खून.

बीड(प्रतिनिधी)बीड दिनांक २१ ऑगस्ट रोजी होमगार्ड महिलेचा मृतदेह बीड शहरालगत एका नाल्याजवळ झाडाझुडपात आढळल्याने एकच खळबळ उडाली होती.

   महिला मिसिंग झाल्याची तक्रार तिचा भाऊ ज्ञानेश्वर सुभाष मुरनर यांनी दिनांक 20/08/2025 रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली होती.महिलेचे नाव अयोध्या राहुल व्हरकटे वय 27 वर्षे रा. लुखामसला, ता. गेवराई, जि. बीड असे असून काल होमगार्ड महिलेचा मृतदेह आढळला.

सदर मिसींग तक्रारीचा तपास चालू असताना दि. 21/08/2025 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्या हिचा खून झाल्याचे समोर आले आहे. तिचा मृतदेह उमरद (जहांगीर) ता. व जि. बीड शिवारातील झाडाझुडपात आढळून आला.

फिर्यादीने दिलेल्या फिर्यादी नुसार, अयोध्या हिचा खून वृंदावणी सतिष फरतारे व तिचा मुलगा यांनी संगनमत करून मृत अयोध्या राहुल व्हरकटे वय 27 वर्षे रा. लुखामसला, ता. गेवराई, जि. बीड हिचा खुन करुन तिचा मृतदेहा हा पुरावा नष्ट करण्याचे हेतुन मृतदेह उमरद (जहांगीर) ता. व जि. बीड शिवारात टाकुन दिला.

या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाणे, बीड येथे गुरनं 439/2025 कलम 103,238,3 (5) भारतीय न्याय संहिता या गंभीर कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक गजानन क्षीरगसार हे करत आहे. होमगार्ड महिलेचा खून प्रेम प्रकरणातून झाल्याची माहिती समोर येत आहे.

सदर कारवाई ही पोलीस अधिक्षक नवनित काँवत साहेब, अपर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर साहेब, उपविपोअ हानपुडे पाटी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पवार, सहा.पोलीस निरीक्षक गजानन क्षीरसागर,सहा. पोलीस निरीक्षक विलास मोरे, पो.उप.नि. धोत्रे, स. फौ.कदम पो.ह. रविंद्र आघाव, संतोष राऊत, म.पो.ह. मिरा पाटील, शितल जोगदंड, पो.कॉ. शुभम सोनवणे, अशोक राडकर, दिलीप राठोड, विलास कांदे, बाळु रहाडे, धनंजय येवले, अनिल घटमाळ, राजाभाऊ जाधव, नवनाथ डाके यांनी केली.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button