ब्रेकिंग न्यूज

दुचाकीवरून येऊन मोबाईल हिसकावून पळवणारे पोलिसांच्या ताब्यात.

स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी.

 

बीड जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसापासून दुचाकी, सोन साखळी चोरांनी धुमाकूळ घातला असून बीड बस स्थानकात गेल्या आठवड्यात सोनसाखळी चोरांनी तर अक्षरशः धुमाकूळ घातल्याने यामुळे मात्र प्रवाश्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.बस स्थानकातील सोन साखळी चोरांकडे संबंधित पोलीस ठाणे पोलिसांची दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे.

बीड शहर व शिवाजीनगर हद्दीमध्ये मोटार सायकलवर येवुन जबरीने मोबाईल हिसकावुन घेवुन जबरी चोरी करणाऱ्या दोन इसमांना स्थागुशा बीड ने केले जेरबंद दहा मोबाईल व मो.सा. असा 2,87,000/- रु चा मुद्देमाल केला जप्त करण्यात आल्या.

फिर्यादी अभिषेक दिनकर केदार वय 20 व्य.शिक्षण रा.संतज्ञानेश्वर नगर यांनी पो.स्टे.शिवाजीनगर येथे फिर्याद दिली की, दि.11/04/2025 रोजी रात्री 09.15 वा. सुमारास पिंपरगव्हाण रोड, गायत्री दुकानाच्या जवळ रोडवरुन घरी फोनवर मित्राला बोलत चालत जात असतांना पाठीमागुन काळया रंगाच्या स्प्लेंडर मोटार सायकलवर तिघेजण आले व त्यातील एका अज्ञात इसमाने माझा मोबाईल हिसकावुन घेवुन ते तिघे तेथुन निघुन गेले. वगैरे फिर्याद वरुन पो.स्टे.शिवाजीनगर बीड येथे गु.र.नं.210/2025 कलम 309(4),3(5) भा.न्या.सं.2023 अन्वये गुन्हयाची दि.12/04/2025 रोजी नोंद करण्यात आली आहे. 

सदर गुन्हयाचा उकल करण्याचे द्ष्टीकोणातुन मा.पोलीस अधीक्षक,बीड यांनी पोलीस निरीक्षक स्था.गु.शा.बीड यांना आदेश दिले. त्यावरुन पो.नि. स्था.गुशा.बीड यांनी आपले अधिपत्याखालील पोउपनि सुशांत सुतळे व त्यांचे पथकाला गुन्हयाचे उघडकीस आणण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन केले. पोउपनि सुशांत सुतळे यांनी त्यांची गोपनिय यंत्रणा सतर्क करुन दिनांक 28/04/2025 रोजी स्थागुशा पथकाला गोपनिय माहिती मिळाली की, दोन इसम हे बीड शहरातुन वेगवेगळया ठिकाणाहुन मोबाईल हिसकावुन चोरुन नेलेले मोबाईल विकणेकामी समर्थ मंगल कार्यालय समोर ते अहिल्यानगर जाणाऱ्या रोडवर येणार असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली तेव्हा सदर माहिती पो.नि. स्था.गु.शा. यांना देवुन त्यांनी तत्काळ पुढील कारवाई करणेचे आदेश दिल्याने स्थागुशा पथक बातमी ठिकाणी जावुन तेथे सापळा लावला असता एक मोटार सायकलवर दोन इसम आल्याचे दिसुन आले तेव्हा त्यांचेकडे जात असतांना त्यांनी तेथुन मो.सा.वर पळुन जाण्याचे प्रयत्नात असतांना त्यांना पथकाने पकडुन त्यांची नावे विचारली असता 1) आदित्य बंकट नरवडे वय 19 वर्षे रा.बालेपीर ता.जि.बीड, 2) नामदेव रामप्रसाद डोईफोडे वय 19 वर्षे रा.ईट ता.जि.बीड असे सांगितले. मोबाईल हिसकावुन चोरी केलेल्या घटनांबाबत बारकाईने विचारपुस केली असता आदित्य नवडे व त्यांचे इतर दोन साथीदार यांनी मिळुन मो.सा.वर जावुन मो.सा.वर जावुन मोबाईल बोलत चालत असलेल्या लोकांचे मोबाईल हिसकावुन चोरी केल्याची कबुली दिली असुन त्यांचे ताब्यातुन एकुण 10 रिअल मी, सॅमसंग अल्ट्रा, रिअल मी, विवो, ओपो, पो.को. कंपनीचे मोबाईल व गुन्हयात वापरलेली स्प्लेंडर मोटार सायकल असा एकुण 2,87,000/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असुन आरोपींकडुन खालील नमुद उकल करण्यात स्था.गु.शा.पथकाला यश आले आहे.

1) पो.स्टे.शिवाजीनगर गुरनं 210/2025 कलम 309(4), 3(5) भा.न्या.सं.

2) पो.स्टे.शिवाजीनगर गुरनं 165/2025 कलम 304(4) भा.न्या.सं.

3) पो.स्टे.बीड शहर गुरनं 40/2025 कलम 303(2), भा.न्या.सं.

4) पो.स्टे.बीड शहर गुरनं 67/2025 कलम 309(4), 3(5) भा.न्या.सं.

सदर गुन्हयात एकुण तीन आरोपी निष्पन्न करण्यात आलेले असुन 1) आदित्य बंकट नरवडे रा.बालेपीर व 2) नामदेव रामप्रसाद डोईफोडे यांना पो.स्टे.शिवाजीनगर,बीड यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे. त्यांचेकडुन मोबाईल चोरीचे आणखीन इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्तता आहे. उर्वरित एक आरोपीचा शोध घेवुन त्यास अटक करण्याचे प्रयत्न चालु आहे.

सदरची कामगिरी नवनित काँवत पोलीस अधीक्षक बीड,सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक बीड, उस्मान शेख पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा,बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि सुशांत सुतळे पोह/मारुती कांबळे, पोह/विकास राठोड, बाळकृष्ण जायभाये, देविदास जमदाडे, पोशि/ नारायण कोरडे,अश्विनकुमार सुरवसे, चापोह/नितीन वडमारे यांनी मिळुन केली आहे.

 

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button