खुनाच्या प्रकरणातील दोन आरोपींची निर्दोष मुक्तता.
चऱ्हाटा रोड जवळ झाला होता खून,ॲड.अविनाश गंडले यांच्या प्रभावी युक्तीवादामुळे दिड वर्षानंतर आरोपी निर्दोष.

बीड(प्रतिनिधी)खून प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, दि. 01/08/2025 रोजी फिर्यादी नितीन नारायण माने याने पोलिसांनी दिलेल्या माहिती आधारे ग्रामीण पोलीस स्टेशन बीड येथे तक्रार दिली की, चऱ्हाटा रोडवरील रेल्वे ब्रिजच्या खाली मृत अवस्थेत एक प्रेत पडलेला आहे. सदरील माहिती फिर्यादीस मिळाल्यानंतर तो महाबळेश्वर येथे असल्याने त्यांनी त्याच्या घरच्या नातेवाईकांना घटनास्थळी पाठवून शहानिशा केली असता सदरील मृतप्रेत हे फिर्यादीचा भाऊ नामे पांडुरंग उर्फ पप्प्या नारायण माने यांच्या आहे हे निष्पन्न झाले. घटनेच्या दिवशी फिर्यादी सोबत विकास वायकुळे व ओंकार लकडे हे दोघे असल्याने केवळ संशयावरून त्यांच्याविरोधात तक्रार दिली.
पोलिसांनी प्रकरणाचा तपास करून सदरील प्रकरणांमध्ये मा. जिल्हा व सत्र न्यायालय बीड येथे दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर मा. न्यायालयात सेशन केस क्रमांक 219/2023 हे प्रकरण करण्यात आले आरोपींच्या वतीने ॲड. अविनाश पं. गंडले यांनी तपासी अधिकाऱ्यासह एकूण 12 साक्षीदार तपासले. आरोपी पक्षाचा बचाव करतांना सातत्यपूर्ण पाठपुरावा, अभ्यासू युक्तिवाद तसेच आरोपींचा प्रस्तुत प्रकरणांमध्ये कसल्याही प्रकारचा सहभाग नसल्याचे
ॲड. अविनाश पं. गंडले मा. न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब बीड यांनी प्रस्तुत प्रकरणातील दोन्ही आरोपींची कोणताही सबळ पुरावा नसल्याने तसेच आरोपींवर आरोप सिद्ध न झाल्याने निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणाकडे बीड जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.
केवळ एक वर्ष सहा महिने अठ्ठावीस दिवसांमध्ये आरोपींची निर्दोष मुक्तता केल्याने ॲड. अविनाश पं. गंडले यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
आरोपींच्या वतीने ॲड. अविनाश पं. गंडले यांनी काम पाहिले तर त्यांना या कमी ॲड. इम्रान पटेल, ॲड. गोवर्धन पायाळ, ॲड. तेजस नेहरकर, ॲड. नामदेव माने, ॲड. किरण मस्के, ॲड. सुरक्षा जावळे, ॲड. शुभम सरवदे, ॲड. सचिन गिरी, ॲड.राजेश शिंदे,ॲड. अनिकेत गंडले, आशुतोष गंडले, आदींनी सहकार्य केले.