सुनिता गीते यांनी आत्मदहन केल्यावरच मुलास नोकरीवर रुजू करून घेणार का ? राकेश जाधव(टायगर ग्रुप जिल्हाध्यक्ष)
सुनीता गीतेनी दिला आत्मदहनाचा इशारा,गीतेसाठी टायगर ग्रुप मैदानात.

समाज कल्याण प्रदेश उपसंचालक यांच्या आदेशाला बीड येथील अधिकाऱ्यांकडून केराची टोपली.
बीड (प्रतिनिधी)परळी येथील श्रीनाथ गोविंद गित्ते हे प्राथमिक आश्रमशाळा वसंतनगर, ता.परळी जि.बीड या शाळेत मा. प्रादेशिक उपसंचालक,इतर मागास बहुजन कल्याण (प्रादेशिक विभाग) छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश दि.03/07/2025 नुसार शाळेवर रुजू होण्यासाठी वारंवार जाऊन देखी रुजू करून घेतले नसल्याने आता टायगर ग्रुप खंबीरपणे गोविंद गीते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे.
आश्रम शाळा व्यवस्थापन व समाज कल्याण बीड मधील अधिकाऱ्याला भ्रष्टाचारणे एवढे बरबटले आहेत. त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशाचं देणे घेणे नाही असंच दिसतआहे व त्यांनी आदेशाला केराची टोपली दाखवत आर्थिक व्यवहार, घेवान घेवाण केली तरच नोकरी वर रुजू करून घेऊ अशी भाषा आश्रम शाळा व्यवस्थापन समाज कल्याण येथील अधिकारी यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.
पतीच्या निधनानंतर अनुकंपावर कुटुंबातील व्यक्तीस, वारसदाराला सेवेत घेतले जाते. सुनीता गीते यांनी प्रचंड संघर्ष करुन स्वतः वरिष्ठ कार्यालयाच्या पायऱ्या झिजवल्या, वरिष्ठांनी रुजू करुन देण्याचे आदेशही दिले. मात्र बीड येथे भ्रष्टाचाराची कीड खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे.गोविंद गीते यांना अद्याप नोकरी वरती रुजू करून घेतला नाही.
सुनीता गीते या स्वतः कर्करोगाने त्रस्त असुन उपचारासाठी आर्थिक अडचण आहे. मागील अनेक वर्षांपासुन पाठपुरावा करुन मुलाला अनुकंपावर नियुक्ती आदेश दिले असताना देखील संबंधीत शाळा रुजू करुन घेण्यास टाळाटाळ करत आहेत.
संबंधीत शाळेवर अथवा बीड जिल्हयात कोणत्याही शाळेत अथवा कार्यालयात गोविंद गीते यांना दि.21/07/2025 पर्यंत रुजु करून न घेतल्यास कार्यालयासमोर दि.23/07/2025 रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे या सर्व गोष्टीस शासन व पोलिस प्रशासन जबाबदार असणार आहे.
गोविंद गीतेला नोकरीवर रुजू करून न घेतल्यास 23 जुलै2025 रोजी बीड येथील कार्यालयाबाहेर आत्मदहन करण्याचा इशारा सुनीता गीते यांनी दिला आहे. अशा स्वरुपाचे लेखी निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक व समाज कल्याण कार्यालय बीड येथे दिले आहे. तरी सुनिता गीते यांचे काही बरेवाईट झाले तर संबंधित कार्यालय व अधिकारी जबाबदार असतील असे राकेश जाधव यांनी पत्रकात म्हटले असून गोविंद गीते यांना रुजू करून न घेतल्यास आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे.