शाळेतच दारू पिलेल्या शिक्षकाला ग्रामस्थांनी रंगेहात पकडले.व्हिडिओ व्हायरल.
शिक्षक शाळेतच दारू पित असल्याने पालकांत,गावकऱ्यात संताप.

बीड (प्रतिनिधी) शाळेतच मद्यप्राशन करून विद्यार्थ्याला शिकविणाऱ्या शिक्षका विषयीची माहिती पालकांना व गावकऱ्यांना माहिती झाली.त्या शिक्षकावर पळत ठेवून मद्यप्राशन केल्यानंतर शिक्षकाला गावातील काही लोकांनी पकडून वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेले.
गेवराई तालुक्यातील श्रीपत अंतरवाला जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील कुलकर्णी नामक शिक्षकाच्या या गैरकृत्या विषयीची चर्चा असून याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. याप्रकरणी गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाण्यात सदर घटनेची नोंद करण्यात आल्याचे समजते. अशी की, गेवराई तालुक्यातील रामपुरी केंद्रातील श्रीपत अंतरवाला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कुलकर्णी नामक शिक्षक नेहमीच मध्यधुंद अवस्थेत विद्यार्थ्यांना शिकवत असल्याची माहिती पालकांना झाली. सदर प्रकरणे या शिक्षकाला धडा शिकवण्याचे गावातील काही जणांनी ठरवले.दिनांक २१ जुलै रोजी बिसलरी पाण्याच्या बाटलीतील दारू पित असताना सदर शिक्षकाला ग्रामस्थांनी रंगेहात पकडले.या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत सदर शिक्षकाची कसून चौकशी करून कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू होती.
सदर गावचे ग्रामस्थ,पालक या घटनेमुळे संतप्त झाले होते. या प्रकरणी गेवराई तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संजय शिंदे यांनी सत्र दाखवून याप्रकरणी ग्रामस्थांना, कायदेशीर कारवाई करण्यात येईल. योग्य ती चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिल्यामुळे ग्रामस्थ शांत झाले.