पोस्को,ॲट्रॉसिटी गुन्ह्यात प्रा.विजय पवारला जामीन मंजूर.

बीड शहरातील नामांकित शिक्षण संकुल उमाकिरण लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांना चार दिवसापूर्वी न्यायालयाने जामीन मंजूर केली होती.
बीड शहरातील उमाकिरण कोचिंग क्लास मधील एका 17 वर्षीय विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनुसार प्रा विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांविरुद्ध पोस्को अंतर्गत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यावर विजय पवार व खाटोकर हे फरार झाले होते.
पोलिसांनी मांजरसुंबा नजीक या दोघांना रात्री उशिरा अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता सुरुवातीला चौकशीसाठी पोलीस कोठडी व त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
पवार आणि खाटोकर या दोघांविरोधात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते 17 जुलै रोजी पोस्को अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात या दोघांना जामीन मिळाल्यानंतर विनयभंग प्रकरणात देखील न्यायालयाने मंगळवारी या दोघांना जामीन मंजूर केला आहे.
या तक्रारीची दखल घेऊन राज्य महिला आयोगाच्या रूपालीताई चाकणकर यांनी या शिक्षण संस्थेतील इतर मुलीवरही असे काही प्रकार घडले असल्यास बीड पोलीस अधीक्षकाकडे तक्रार करण्यात यावी असे आवाहन केले होते, त्यावर बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याकडे श्री संत ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने आपल्या पालकास घडलेला प्रकार सांगून,प्रा.विजय पवार यांनी जातीय वाचक बोलण्याचे पालिकाने बीड पोलीस अधीक्षकाची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला.त्यावर विनयभंग व ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल केला होता.त्यावर आज सुनावणी होऊन प्रा.विजय पवारला ॲट्रॉसिटी मध्ये जामीन मंजूर करण्यात आला.
आरोपीच्या वतीने वतीने ज्येष्ठ विधीज्ञ बाळासाहेब कोल्हे यांनी काम पाहिले.