ब्रेकिंग न्यूज

भर पावसात गोदावरी पात्रात छापा.

नऊ लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त,स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

बीड : पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने गोदावरीत छापा मारला. यावेळी जवळपास ९ लाख ५० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी बीड जिल्हयामध्ये चालणार्‍या विनापरवाना बेकायदेशिररित्या वाळु उपसा करणार्‍या इसमांवर कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखा बीड यांना आदेशित केले होते त्यावरुन दिनांक १६.०८.२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप् बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, मौजे म्हाळसपिंपळगांव शिवारातील गोदावरी नदी पात्रामध्ये अवैध विनापरवाना बेकायदेशिररित्या वाळु उपसा सुरु आहे. त्यावरुन पथकाने सदरील ठिकाणी जावुन गोदावरी नदी पात्रामध्ये छापा मारला असता पोलीसांना पाहुन वाळु उपसा करणारे टॅक्टर, रोडर हे पळुन गेले, पोलीसांनी टॅक्टर व रोडरचा पाठलाग करुन टॅक्टर व रोडर पकडले परंतु त्याचे दोन्ही चालक बाजुस असलेल्या शेतामध्ये पळुन गेले. गोदावरी नदीपात्रामध्ये अवैध वाळु उपसा करुन चोरटी वाहतुक करीत असलेल्या एक टॅक्टर व टॅक्टर रोडस असे एकुण ९,५०,०००/- रु मुद्देमाल जप्त करुन दोन्ही पळुन गेलेल्या चालकांविरुध्द पोलीस ठाणे गेवराई येथे गु.र.नं ४९२/२०२५ कलम ३०३ (२),३ (५) भारतीय न्यास संहीता कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असुन सदरील गुन्हयाचा पुढील तपास पोलीस ठाणे गेवराई हे करीत आहेत.

सदरील कामगिरी नवनीत कॉंवत, पोलीस अधीक्षक, बीड, सचिन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक बीड, शिवाजी बंटेवाड, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार विकास राठोड, राहुल शिंदे, अंकुश वरपे, नितीन वडमारे, पोलीस अंमलदार अर्जुन यादव, आशपाक सय्यद, मनोज परजणे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांनी केलेली आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button