ब्रेकिंग न्यूज

अग्निशामक दलाच्या कार्यतत्परतेने मोठा अनर्थ टळला !

नगरसेवक विनोद मुळूक व अग्निशामक दल कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक.

बीड(प्रतिनिधी)बीड शहरातील शिवाजी नगर भागातील दत्ता नगर , त्रिमूर्ती कॉलनी मध्ये मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास होळकर यांच्या घरी गॅस लिकेज होवून गिझर चा स्फोट होऊन अचानक मोठी आग लागली. स्फोटाचा आवाज आल्याने होळकर कुटुंब भयभीत झाले.तसेच या भागातील नागरिक जमा होवून मदत करण्यास धावले.

   होळकर यांच्या घरातील गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाले घराला आग लागली.या घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक,सभापती विनोद मुळूक यांनी अग्निशमन विभाग व शिवाजी नगर पोलिस  यांच्याशी संपर्क करून अग्निशामक दलाची वाहन पाठवण्याची सूचना केली. अग्निशामक दलाची वाहन येईपर्यंत सभापती विनोद मुळूक व सहकार्यांनी होळकर यांच्या कुटुंबातील व्यक्तींना बाहेर काढण्यात मदत करून आग विजवण्याचा प्रयत्न केला.

 अग्निशामक दलाचे वाहन व कर्मचारी घटनास्थळी  अवघ्या 3 मिनिटात फायरब्रिगेड च्या गाडीसह घटनास्थळी पोहचले. अग्निशामक दल अधिकारी व कर्मचाऱ्यांनि 10 मिनिटात सर्व परस्थिती आटोक्यात आणली.अग्निशमन विभागाचे कर्मचारी-शिवाजी नगर पोलिस आणि स्थानिक रहिवाश्यांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेमुळे पुढील अनर्थ टळला.

 अग्निशमन वाहन:- १)MH-23 F-5218 (वॉटर टेंडर)सोबत कर्मचारीकिशोर जाधव(अग्निशमन अधिकारी)रमेश अदमाने (सिनियर फायरमन),विष्णु कानतोडे (सिनियर फायरमन ),सागर मोहिते (वाहन चालक),प्रकाश तिडके (फायरमन)योगेश जोगदंड यांनी आज विजवल्याने मोठा अनर्थ तळल्याने नागरिकांनी आभार मानले.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button