बीड मध्ये तोतया आरटीओ वाहनधारकांना दिवसाढवळ्या लुटले.
आरटीओ गणेश विघ्ने यांच्या तक्रारी नंतर बीड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

बीड : मागील काही महिन्यात आंबेजोगाई येथील उपप्रादेशिक वाहन कार्यालयात आरटीओ असल्याचे सांगत बीड आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बोगस कामे करा,वाहन पासिंग करा असा दबाव टाकत असल्याने त्याच्यावर संशय आल्याने तत्काळ याची माहिती आरटीओ बीड ग्रामीण पोलिसांना देऊन ताब्यात घेतले असता तो तोतया बनावट आरटीओ असल्याचे उघड झाले होते.
अशाच प्रकार गेवराई तालुक्यातील तलवाडा परिसरात आज सकाळी बनावट आरटीओची हुबेहुब गाडी बनून त्यात बनावट आरटीओ व चालक हे दोघे मिळून आरटीओचा धाक दाखवून वाहनधारकाकडून लूट करत असल्याची माहिती बीड पोलीसांना मिळाल्यानंतर बीड पोलीसांनी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या सूचनेनुसार तलवाडा परिसरात जावून या दोघांच्या मुसक्या आवळल्या. या दोघांना विश्वासात घेतल्यानंतर यादोघांनी आम्ही बनावट लोकसेवक बनून अनेकांकडून पैसे घेतल्याची कबुली दिली. हे दोघे किती दिवसांपासून असा प्रकार करत होते यासह इतर बाबींच्या अनुषंगाने बीड ग्रामीण पोलीसांत पुढील तपास सुरू आहे.मोटार वाहन निरिक्षक गणेश विघ्णे यांच्या फिर्यादीवरून आरोपी अजय बालाजी गाडगे (वय २४ वर्षे रा. अमरदनगर, डगलॅण्ड खंडोबा टेकडी, घाटकोपर मुंबई व दूसरा आरोपी दिनेश मंगल धनसर(वय ३८ रा. खोली क्र. २३ पांडुरंग वकीलवाडी कलानी, मुंबई) अशा दोघांविरोधात ४२० चा गुन्हा बीड ग्रामीण पोलीसात नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे प्रमुख उस्मान शेख यांच्या टिममधील जगताप, मनोज वाघ, कैलास ठोंबरे, विकास वाघमारे, शिवाजी खवतड यांनी केली.या दोघांनी आरटीओ चे गणवेश परिधान करून व गाडी करून आणखी कोणत्या जिल्ह्यात वाहनधारकांना लुटले आहे का याचा देखील तपास होणे आवश्यक आहे.